Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सामाजिक वनीकरण संचालनालय वन विभागाच्या नियंत्रणाखाली

$
0
0
पडीक जमिनीवर वनीकरण करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले सामाजिक वनीकरण संचालनालय आता वन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा बदल करताना कर्मचाऱ्यांच्या सेवेत अथवा वेतनात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिवेशनात ठरणार कामगारविषयक धोरण

$
0
0
भारतीय मजदूर संघाचे त्रैवार्षिक प्रांतिक अधिवेशन ४२ वर्षांनंतर येत्या एप्रिल महिन्यात पुण्यामध्ये होणार आहे. या अधिवेशनात कामगारविषयक धोरणासह विविध प्रश्नांबाबतची भूमिका ठरवली जाणार असल्याची माहिती संघाच्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख उदय पटवर्धन यांनी रविवारी दिली.

विरोधी पक्षनेतेपदाला सत्ताधाऱ्यांचा ठेंगाच

$
0
0
लोकसभेप्रमाणेच राज्यातील विधानसभेतही विरोधी पक्षनेता निवडण्याचा निर्णय तूर्त न घेण्याची व्यूहरचना भाजप-शिवसेनेच्या सरकारने आखली असल्याचे सत्ताधारी पक्षाच्या गोटातून सांगण्यात आले.

कृषी अधीक्षकाला पिस्तुल दाखवले

$
0
0
शिवाजीनगर येथील कृषीभवनात ‘अॅग्रिकल्चर बिझनेस डेव्हलपमेंट’ या कोर्ससाठी अॅडमिशन मिळाले नाही, म्हणून कृषी अधीक्षकालाच पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावण्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला.

आठ रस्ते खोदणार

$
0
0
स पाइपलाइन, तसेच ‘सीसीटीव्ही’ची केबल टाकण्यासाठी शहरात खोदकाम करत रस्ते खड्डेमय झाले असतानाच, आता एका बड्या टेलिकॉम कंपनीने ‘ओएफसी’ केबल टाकण्याचा घाट घातला आहे. शहरातील प्रमुख आठ रस्त्यांवर ही केबल टाकण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे परवानगी मागितली आहे.

संत साहित्याचे योगदान मतदारापर्यंत पोहोचले

$
0
0
‘जागतिकीकरणामुळे भौतिक सुख-सुविधांची अनुकूलता असूनही वाढत चाललेल्या अस्वस्थतेच्या वातावरणात संत साहित्याचे मार्गदर्शनच आपल्याला दिलासा देईल. भारतीय परंपरेतील या साहित्याचे योगदान नेमके काय आहे, याविषयीची माझी भूमिका घुमानच्या साहित्य संमेलनानिमित्त मतदारांपर्यंत पोहोचवता आले याचे समाधान आहे,’ असे मत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले.

भूसंपादन कामातील मोजणीला प्राधान्य द्या

$
0
0
जमिनीचे सर्वेक्षण व मोजणीतील विलंबामुळे भूसंपादनाची कार्यवाही मुदतीत पूर्ण होत नाही. परिणामी शहर विकास योजनेतील मंजूर आरक्षणे रद्द होत असल्याने अशा मोजणीसाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत.

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला दिल्ली, गोव्याची पसंती

$
0
0
ख्रिसमस’चा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महाबळेश्वरहून पुण्याच्या मार्केट यार्डात आवक होणाऱ्या लाल रंगाच्या स्ट्रॉबेरीने दिल्ली, गोव्याप्रमाणेच आता गुजरातच्या खवय्यांना भुरळ घातली आहे. या राज्यांनी पसंती दिल्यामुळे स्ट्रॉबेरीच्या दरात चांगली वाढ झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकच नाहीत

$
0
0
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर होत असलेल्या कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांमध्येही विविध पक्षांतील इच्छुकांनी भाजपचा धसका घेतला असून, पुणे बोर्डाच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अवघ्या दहाच इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.

आयसर प्रवेशासाठी मेडिकल एन्ट्रन्सही ग्राह्य

$
0
0
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’ अर्थात ‘आयसर’मधील प्रवेशांसाठी आता राष्ट्रीय पातळीवरील ऑल इंडिया प्री-मेडिकल/प्री-डेन्टल मेडिकल टेस्ट (एआयपीएमटी) या प्रवेश परीक्षेचा स्कोअरही ग्राह्य धरण्यात येणार आहे. सध्या या संस्थेतील प्रवेश मुख्यत्वे ‘जेईई-अॅडव्हान्स्ड’च्या स्कोअरवर होत आहेत.

शेवटच्या दोन दिवसांत ‘मतपत्रिकांचे गठ्ठे’?

$
0
0
साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणुकीच्या मतपत्रिका येण्याचा वेग काही प्रमाणात वाढला आहे. मतपत्रिका महामंडळाकडे पोहोचण्यासाठी शेवटचे दोनच दिवस बाकी असून, याच काळात ‘मतपत्रिकांचे गठ्ठे’ महामंडळाकडे दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सातबाराचे उतारे आता ऑनलाइन पद्धतीने

$
0
0
सातबाराचे उतारे आता ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहेत; तसेच दस्तनोंदणीनंतर ऑनलाइन पद्धतीनेच त्याच्या फेरफार नोंदीही केल्या जाणार आहेत.

भाजप उमेदवारीसाठी ५३ इच्छुकांच्या मुलाखती

$
0
0
खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या ११ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. आठ वॉर्डांसाठी ५३ इच्छुकांनी मुलाखती दिल्या.

अमोस मेंडीला विजेतेपद

$
0
0
केनियन धावपटूंनी रविवारी झालेल्या २९व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये वर्चस्व गाजविले. केनियाच्या अमोस माइयो मेंडीने पूर्ण मॅरेथॉनमध्ये (४२.१९५ किमी) २ तास १८ मिनिटे आणि ३६ सेकंद वेळ नोंदवीत विजेतेपद पटकावले; तसेच पुरुषांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये केनियाच्याच डॅनिएल मुटेती याने, तर महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्येही केनियाच्याच नॅन्सी वाम्बुआ हिने बाजी मारली.

चुका ‘त्यांच्या’ फटका सर्वांना

$
0
0
‘राज्य सहकारी बँकेचे अधिकारी आणि काही संचालकांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम संचालक मंडळातील सर्वांना भोगावे लागत आहेत,’ अशी स्पष्ट कबुली राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात दिली.

पोषण आहाराची दर आठवड्याला तपासणी

$
0
0
महापालिकेच्या शाळांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराची आता दर आठवड्याला तपासणी होणार असून, त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर स्वतंत्र पथके नेमण्याचे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्तांनी शनिवारी दिले आहेत.

मेंटल हॉस्पिटलच्या सोलर यंत्रणेची दुरुस्ती

$
0
0
काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या सोलर यंत्रणेकडे मेंटल हॉस्पिटल प्रशासनाचे लक्ष गेले आणि सोलर यंत्रणेच्या दुरुस्तीला वेग आला. २४ पैकी १९ सोलर यंत्रणा काही दिवसात कार्यान्वित झाल्याने अखेर मनोरुग्णांनाही अंघोळीसाठी थंडीत गरम पाणी मिळू लागले.

तृतीयपंथीयांकडून पोलिसाला मारहाण

$
0
0
कात्रज - देहूरोड बाह्यवळण रस्त्यावर दत्तनगर चौकाशेजारी तृतीयपंथीयांनी धुडगूस घालून चार दुचाकींची मोडतोड केली. बेफाम दगडफेक करणाऱ्या या तृतीयपंथीयांना हटकण्यासाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षक सुभाष महाले यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकारही यावेळी घडला.

इंग्रजी शाळांचा दर्जा कारणीभूत

$
0
0
ग्रामीण भागात गेल्या चार-पाच वर्षांत सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या सुमार दर्जामुळे विद्यार्थ्यांची गळती वाढली असून, हे विद्यार्थी जिल्हा परिषदेच्याच शाळांना प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट वाढू लागला असल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केला आहे.

शेतकऱ्यांच्या उसासाठी अधिवेशनात भूमिका

$
0
0
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, त्यांच्या उसाला चांगला दर मिळावा या साठी अधिवेशनात भूमिका मांडणार असल्याचे आमदार अजित पवार यांनी इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images