Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पत्रकारांचा आवाज क्षीण होतोय...

$
0
0
‘देशातील हवा दिवसेंदिवस गरम होत असताना पत्रकार मात्र वाऱ्याबरोबर दिशाहीन होऊन वाहत आहेत. वाऱ्याबरोबर दिशा बदलणे हे पत्रकारांचे काम नाही. गेल्या काही वर्षात पत्रकारितेच्या मूल्यांचे अधःपतन झाले असून पत्रकारांचा आवााज क्षीण होतो आहे,’ अशी खंत ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी व्यक्त केली.

रुबी, सह्याद्रीमध्ये शहरी गरीब योजना बंद

$
0
0
शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील गरजू नागरिकांना कमी दरात उपचार मिळावेत यासाठी सुरू करण्यात आलेल्या शहरी गरीब योजनेचा निधी संपला आहे. परिणामी गेल्या महिन्यापासून रुबी हॉल आणि सह्याद्री हॉस्पिटलमध्ये शहरी गरीब योजनेच्या लाभार्थ्यांना प्रवेश दिला जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

स. गो. बर्वे चौकातील ग्रेड सेप्रेटरला मुहूर्त कधी?

$
0
0
जंगली महाराज रोडवरील स. गो. बर्वे चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या चौकात उभाण्यात येत असलेले ग्रेड सेप्रेटरचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. गेली दोन वर्षे सुरू असलेले काम पूर्ण होण्यासाठी महापालिका नक्की कुठला मुहूर्त काढणार अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे.

१९ विद्यार्थ्यांना विषबाधा

$
0
0
महापालिका शिक्षण मंडळाच्या विद्यानिकेतन शाळेतील १९ विद्यार्थ्यांना शुक्रवारी खिचडीतून विषबाधा झाली. या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने उपचारांसाठी पालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पासपोर्ट अपॉइंटमेंटच्या संख्येत वाढ

$
0
0
पासपोर्टची वाढती मागणी लक्षात घेऊन कार्यालयाने अपॉइंटमेंटच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ केली आहे. पासपोर्ट सेवा केंद्रातर्फे आता दररोज नियमित पासपोर्टच्या १००० अपॉइंटमेंट उपलब्ध होणार आहेत.

गणेशखिंड रोडवर दुचाकींसाठी वेगळा ट्रॅक

$
0
0
गणेशखिंड रोडवर होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर दुचाकींसाठी वेगळा ट्रॅक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाजीनगरचे स्थानिक आमदार विजय काळे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येणार असून, वाहतूक पोलिसांच्या मदतीने ही योजना राबविली जाणार आहे.

रागांवर आधारीत सुगंधांची निर्मिती

$
0
0
विविध प्रकारच्या रागांवर आधारीत पुरिया, मनोरंजनी, झिंझोटी, मेघ आणि रामकली या पाच प्रकारच्या अत्तरांची निर्मिती करण्यात आली आहे. सवाई गंधर्व महोत्सवातही अत्तरांचे प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे.

पुण्याला खंडपीठ हवे

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे; तसेच शासकीय गोदामाची जागा जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी तातडीने देण्यात यावी, या मागण्यांसाठी पुणे बार असोसिएशनतर्फे शुक्रवारी कामगार पुतळा चौकात रास्ता रोको आणि आंदोलन करण्यात आले.

कँटोन्मेंटमध्येही आता भाजप-सेना युती

$
0
0
राज्यात यापुढील निवडणुका भाजप आणि शिवसेना युती करून लढविण्याचे ठरविण्यात आल्याने कँटोन्मेंट बोर्डांच्या निवडणुकीत युती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, भाजपने इच्छुकांच्या मुलाखतींचे सोपस्कार शुक्रवारी पूर्ण केले, तर शिवसेनेने मुलाखतींना स्थगिती दिली.

भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी ठाकूर यांचा मार्ग मोकळा?

$
0
0
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात गिरीश महाजन आणि राम शिंदे यांचा समावेश झाल्याने भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी उस्मानाबादचे सुजितसिंह ठाकूर यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

परदेशातून घेतली 'हायटेक' साक्ष

$
0
0
शिवाजीनगर कोर्टात दाखल झालेल्या एका खटल्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पतीची साक्ष नोंदविली जाणार आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या दाव्यात पतीची अशा प्रकारे साक्ष नोंदविण्याची शिवाजीनगर कोर्टातील ही पहिलीच केस असल्याचा दावा केला जात आहे.

‘आयबी’ अॅलर्ट, पुण्यात खबरदारी

$
0
0
केंद्रीय गुप्तचर विभागाने (आयबी) देशात सतर्कतेचा इशारा दिल्याने पुण्यातही खबरदारी घेण्यात येत आहे. पोलिस आयुक्तालयाच्या गेटवर; तसेच शहरात रस्त्यांवर शुक्रवारी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती.

बँक घोटाळ्याची सुनावणी पुढे

$
0
0
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरकारभाराला जबाबदार धरण्यात आलेल्या संचालकांनी सुनावणीसाठी मुदत वाढवून मिळण्याची मागणी केल्याने आता १९ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.

मेट्रो प्रकल्पासाठी मनसे आग्रही

$
0
0
‘मेट्रोबाबत शहराचे खासदार आणि केंद्र सरकारकडून होणाऱ्या विलंबावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आवाज उठविला असून, शहरासाठी आवश्यक असणारा मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा,’ अशी मागणी करण्यात आली आहे.

२२५ बस बाद करणार

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सध्या बंद पडलेल्या साडेसहाशेपैकी नऊ वर्षांहून जुन्या असलेल्या सव्वा दोनशे बसवर यापुढे देखभाल-दुरुस्तीसाठी कोणताही खर्च करण्यात येणार नाही.

पर्यावरणाची दखल कधी?

$
0
0
पीएमपी कधी सुधारणार इथेपासून ते कचरा, शहरातील औद्योगिक, शैक्षणिक धोरणापर्यंत अनेक विषयांवर उद्यापासून अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे. शहराच्या पायाभूत सुविधांबरोबरच आता पुण्याच्या पर्यावरणीय समस्याही चर्चा झाली पाहिजे.

रसिक अनुभवणार संमेलनात ‘नामदेवभक्ती’

$
0
0
महाराष्ट्राच्या पावनभूमीतून गेलेल्या संत नामदेवांनी समस्त पंजाबवासियांना भक्तीपरंपरेचा धडा शिकविला. त्याच पंजाबच्या घुमानचे नागरिक आता पुणेकरांसह महाराष्ट्रातील साहित्यिक, प्रेमींचे स्वागत करायला तयारीला लागले आहेत.

भक्तिरंगात रंगला दत्त जन्माचा सोहळा

$
0
0
दत्त मंदिरांमध्ये केलेली फुलांची आकर्षक सजावट....विद्युत रोषणाईने सजविलेला कळस...गाभाऱ्यात दरवळणारा धूप-अगरबत्तीचा सुगंध...होमहवन अन् कीर्तनामुळे वातावरणात निर्माण झालेले भक्तीमय वातावरणात पुण्यातील विविध भागात शनिवारी उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली.

मॉलमध्ये काम करणं धोक्याचं!

$
0
0
घरची गरिबी पार करून मॉलमधील चकाचक वातावरणात रोज दहा तास काम करणाऱ्या मॉलमधील मुलींच्या मनावर येणारा अनावश्यक ताण भविष्यातील सामाजिक प्रश्नांची नांदी ठरू शकतो, असा निष्कर्ष ‘स्त्री मुक्ती संघटने’नेने नुकत्याच केलेल्या सर्व्हेतून काढण्यात आला आहे.

मेट्रोचा अतिरिक्त खर्च केंद्राने करावा

$
0
0
भूमिगत मेट्रोसाठीचा खर्च पाहता त्याचे तिकिट दरही सर्व सामान्यांना न परवडणारे असते. त्यामुळे आम्ही काही ठिकाणी भूमिगत व काही ठिकाणी एलिव्हेटेड मेट्रोचा प्रस्ताव ठेवला होता. आता पुण्याची मेट्रो संपूर्ण भूमिगत करायची चर्चा सुरू आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images