Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मेंटल हॉस्पिटलच्या सोलर यंत्रणेची दुरुस्ती

$
0
0
काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या सोलर यंत्रणेकडे मेंटल हॉस्पिटल प्रशासनाचे लक्ष गेले आणि सोलर यंत्रणेच्या दुरुस्तीला वेग आला. २४ पैकी १९ सोलर यंत्रणा काही दिवसात कार्यान्वित झाल्याने अखेर मनोरुग्णांनाही अंघोळीसाठी थंडीत गरम पाणी मिळू लागले.

मेट्रो मूळ डीपीआरनुसारच होईल

$
0
0
शहराच्या मेट्रोबाबत गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा उलट-सुलट चर्चा सुरू झाली असतानाच, यापूर्वीच्या मान्य आराखड्यानुसारच मेट्रो होईल, अशी ठाम भूमिका अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी मांडली.

रेशन कार्यालयांत आता ५६ सीसीटीव्ही कॅमेरे

$
0
0
शहरातील रेशन कार्यालयांमधील गैरकारभाराला घालण्याबरोबरच एजंटांच्या विळख्यातून ही कार्यालये मुक्त करण्यासाठी ५६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. येत्या पंधरा दिवसांत हे कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

पुण्याच्या प्रलंबित प्रश्नांना आता गती

$
0
0
पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या पिण्याच्या पाण्यापासून ते पीएमपी, कचरा, वाहतूक, पीएमपी, रिंगरोड, कायदा-सुव्यवस्था आणि पीएमआरडीए अशा सर्व प्रलंबित प्रश्नांना आगामी काळात गती देण्याचे ठोस आश्वासन संसदीय कामकाज आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी दिले.

पोषण आहाराची दर आठवड्याला तपासणी

$
0
0
महापालिकेच्या शाळांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराची आता दर आठवड्याला तपासणी होणार असून, त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर स्वतंत्र पथके नेमण्याचे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्तांनी शनिवारी दिले आहेत.

‘त्यांच्या’ चुकीच्या निर्णयांचा सर्वांना फटका

$
0
0
‘राज्य सहकारी बँकेचे अधिकारी आणि काही संचालकांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम संचालक मंडळातील सर्वांना भोगावे लागत आहेत,’ अशी स्पष्ट कबुली राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात दिली.

जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाइन पाहता येणार

$
0
0
बोगस जात प्रमाणपत्राची पडताळणी करणे सोपे जावे, यासाठी प्रत्येक जात प्रमाणपत्राचे आणि जात वैधता प्रमाणपत्राचे स्कॅनिंग करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) घेतला आहे.

सत्ताधाऱ्यांच्या गोंधळात पुणे मेट्रोची फरफट

$
0
0
शहराच्या खासदारांना मेट्रो भुयारी मार्गाने नेण्याचे स्वप्न पडले असताना, राज्य मंत्रिमंडळातील त्याच पक्षाच्या नवनिर्वाचित मंत्र्यांनी मेट्रो प्रकल्प ठरल्यानुसारच होईल, असे शनिवारी जाहीर केले आहे.

‘हा विरोधी पक्षांचा अपमान!’

$
0
0
नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिनवेशनाच्या चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नसल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. मुख्यमंत्री उपस्थित न राहता संसदीय कार्यमंत्री चहापान घेणार असतील, तर तो विरोधी पक्षांचा अपमान आहे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आज ‘पुणं’ धावणार

$
0
0
भारतीय मॅरेथॉनची जन्मभूमी असणांर पुणं आज जणू धावणार आहे. निमित्त आहे ते २९व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे. दीडशे परदेशी धावपटूंसह २५ हजार जणांचा सहभाग या मॅरेथॉनमध्ये असणार आहे.

पुण्यात वाढला थंडीचा कडाका

$
0
0
शहरात बस्तान बसविलेल्या थंडीचा पारा शनिवारी आणखी घसरून दहा अंशांवर आला. शहरात शनिवारी १०.७ अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच पारा दहा अंशांखाली उतरला आहे. पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे.

पद्मजा फाटक यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ लेखिका पद्मजा फाटक यांचे दीर्घ आजाराने शनिवारी पुण्यात निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पाथीवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.

सत्तेची धुंदी नाही!- बापट

$
0
0
‘राज्यातील सरकार आम्ही नम्रपणे चालवू. आम्हाला सत्तेची धुंदी चढली नाही, चढणार नाही आणि कोणाला धुंदी चढूही देणार नाही’, अशा शब्दांत संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले.

भाजपला सत्तेची धुंदी!: अजित पवार

$
0
0
नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिनवेशनाच्या चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नसल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. मुख्यमंत्री उपस्थित न राहता संसदीय कार्यमंत्री चहापान घेणार असतील, तर तो विरोधी पक्षांचा अपमान आहे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

१२ डिसेंबरला शाळा ‘बंद’?

$
0
0
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नी आक्रमक झालेल्या शिक्षक संघटनेचा पवित्रा लक्षात घेता येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूरला या संघटनांना चर्चेसाठी बोलविण्याचा निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे.

‘एक मुठ्ठी आसमाँ’चे प्रकाशन

$
0
0
‘मुस्लिम स्त्र‌ियांनी आत्मचरित्रे लिहिली आहेत. मात्र एक हिंदु लेखिका एका मुस्लिम स्त्रीची चरित्रगाथा लिहिते, ही विशेष गोष्ट आहे,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी नुकतेच काढले.

साठ पक्षकारांना अपंगत्व दाखल्यांचे वाटप

$
0
0
मोटार अपघातात जखमी झालेल्या पक्षकारांना कोर्टात नुकसानभरपाई मिळावी म्हणून अपंगत्वाचा दाखला सादर करावा लागतो. मात्र त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पुणे जिल्हा विधी प्राधिकरणातर्फे पुढाकार घेऊन शिवाजीनगर कोर्टात शनिवारी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून दाखला देण्यात आला.

पाषणशाळांच्या मान्यतेसाठी

$
0
0
‘दगडखाण क्षेत्रातील उपेक्षित गटातील वंचित बालकांसाठी पर्याय ठरलेल्या ‘संतुलन पाषाण शाळा’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाला सरकारकडून अनुदानित मान्यता मिळावी. दगडखाणीतील बालकांच्या शिक्षणासाठी सरकारने नवीन योजना राबविण्याची गरज आहे, यासाठी मी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे,’ असे आश्वासन माजी आमदार भगवान साळुंखे यांनी व्यक्त केले.

साखर, ज्वारी, पोह्याच्या दरात घट

$
0
0
मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने सोयाबीन, पामतेल, साखर, पोहे, ज्वारी, बाजरी, भगर, साबुदाणा, सरकी आणि भाजक्या डाळी स्वस्त झाल्या आहेत. दुसरीकडे गेल्या आठवड्यात दर वाढलेल्या गोटा खोबऱ्यांनी पुन्हा मागणी वाढली. त्यामुळे त्याचेही दर कडाडलेले आहेत.

वाहतूक पोलिस कशाला?

$
0
0
ज्या चौकात सिग्नल आहे, त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची गरज काय, असा प्रश्न उपस्थित करत शहरातील पंधरा चौकांत वाहतूक पोलिसांची नेमणूक न करण्याच्या विचारात असल्याचे वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांनी सांगितले. दरम्यान, चौकाचौकांत गटागटाने उभे राहत असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांचीही त्यांनी पाठराखण केली, ‘ते माझ्याच आदेशाने गटागटाने उभे राहत आहेत,’ असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images