Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अनुभवा बासरीचा गोडवा

$
0
0
तळ्याकाठचा रम्य परिसर आणि संध्याकाळच्या शीतल वातावरणात उलगडत जाणारी मोहक बासरीची सुरावट... असा धुंद स्वरानुभव घेण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य असलेल्या राकेश चौरासिया यांच्या बासरी वादनाची ही मैफल रविवारी (७ डिसेंबर) होणार आहे.

सोमणांची नाटकं रंगणार कॅनडात

$
0
0
रंगभूमीवरील आघाडीचे नाटककार- दिग्दर्शक योगेश सोमण यांच्या पाच नाटकांचा महोत्सव ५ व ६ डिसेंबर रोजी कॅनडामध्ये होतोय.

‘रुपी’ तारण्यासाठी हालचालींना वेग

$
0
0
आर्थिक कचाट्यात सापडलेल्या रुपी सहकारी बँकेला तारण्यासाठी हालचालींना वेग आला असून, फेडरल बँकेसह एका राष्ट्रीयकृत बँकेकडे विलिनीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या दोन्हीपैकी एका बँकेशी विलिनीकरणाविषयी फलदायी चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

सुरक्षारक्षक महिलांच्या अपहरणाचा बनाव

$
0
0
मैत्रिणीला दवाखान्यात घेऊन जाण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडल्यानंतर हिंजवडीतून बेपत्ता झालेल्या तीन सुरक्षारक्षक महिलांना पोलिसांनी अखेर भुसावळ येथून ताब्यात घेऊन गुरुवारी नातेवाइकांकडे सुखरूप सुपूर्द केले.

ससूनच्या ‘कॅथलॅब’ला नव्या वर्षाचा मुहूर्त

$
0
0
ससून हॉस्पिटलमध्ये सुमारे पावणेदोन वर्षांपासून बंद असलेली ‘कॅथलॅब’ची सुविधा अद्याप सुरु होण्यासाठी नव्या वर्षातील जानेवारी महिना उजाडणार आहे.

खंडपीठ पुण्यालाच हवे

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे आणि शिवाजीनगर जिल्हा कोर्टाशेजारी असलेली शासकीय गोदामाची जागा मिळावी या मागण्यांसाठी वकिलांतर्फे शुक्रवारी (आज) तीव्र आंदोलन आणि रास्ता रोको करण्यात येणार आहे; तसेच कोणतेही वकील कोर्टाच्या कामकाजात सहभाग घेणार नाहीत.

‘प्रभात’ टिकविण्यास सर्वतोपरीने प्रयत्न

$
0
0
‘प्रभात चित्रपटगृह पुण्याचा ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे ते टिकविण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. शहराच्या विकास आराखड्यात ‘प्रभात’चा समावेश करण्याच्या दृष्टीनेही विचार केला जाईल,’ असे आश्वासन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिले.

‘स्मार्ट सिटी’साठी महापौरांचे पंतप्रधानांना पत्र

$
0
0
आयआयएम, मेट्रो, बुलेट ट्रेन या प्रत्येक गोष्टीमध्ये सध्या पिछाडीवर पडलेल्या पुण्याला केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून डावलले जाऊ नये, यासाठी महापौरांनीच पुढाकार घेतला आहे.

‘आकार’ पुढील वर्षापासून लागू होणार

$
0
0
राज्यातील पूर्वप्राथमिक शाळांच्या एकसमान शैक्षणिक धोरणासाठी महत्त्वाचा ठरणारा ‘आकार’ हा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केला आहे.

संजय दत्तचा पुन्हा ‘फर्लो’साठी अर्ज

$
0
0
शस्त्र बाळगल्याप्रकरणी येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्तने ‘फर्लो’ रजेसाठी जेल प्रशासनाकडे अर्ज केला आहे. मात्र, या अर्जावर अद्यापपर्यंत निर्णय घेण्यात आलेला नाही.

‘प्रभात’ पाडण्याचा विचार नाही’

$
0
0
‘प्रभात थिएटरची जागा विकली जाणार नाही. यापूर्वी कधीही आम्ही असा उल्लेख केलेला नाही. भावनिक मुद्दा करून आमच्याविरुद्ध लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रकार होत असल्याचे वाटते,’ असे स्पष्टीकरण प्रभात थिएटरच्या जागेचे मालक अजय किबे यांनी दिले.

मुख्यमंत्री सरसावले, जुळली मने

$
0
0
शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका मोलाची ठरली आहे. केंद्रातील भाजप नेते व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा दररोज संपर्क ठेऊन तुटलेली महायुती जोडली. समन्वय समितीची स्थापना करून त्यांनी युती टिकविण्यासाठीची यंत्रणा तयार केल्याचे बोलले जात आहे.

भुयारी मेट्रोमुळे पुणे ‘खड्ड्यात’

$
0
0
देशातील मेट्रो धावत असलेल्या प्रमुख दहा शहरांमध्ये मेट्रोचे एलिव्हेटेड आणि भुयारी असे संमिश्र मॉडेल उभे राहिले आहे. यापैकी बहुतांश शहरांमधील मेट्रो प्रकल्पांमध्ये भुयारी मेट्रोचे प्रमाण नगण्य आहे.

अजितदादांची आजपासून चौकशी

$
0
0
राज्य सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या तोट्याला जबाबदार धरण्यात आलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह ६५ संचालकांची चौकशी आजपासून सुरू होत आहे. या चौकशीत संचालकांवरील आरोप निश्चित करून त्यावर सुनावणी घेण्यात येणार आहे.

गिरीश बापट यांना कॅबिनेट?

$
0
0
शिवसेनेशी समझोता झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार मार्गी लागणार आहे. आज (शुक्रवारी) होणाऱ्या शपथविधीमध्ये पुण्यातून ज्येष्ठ आमदार गिरीश बापट यांचा समावेश निश्चित झाल्याचे सांगण्यात आले.

हेरिटेज वॉकमध्ये ऐका नानासाहेबांचं चरित्र

$
0
0
१८५७ च्या समरासाठीचं कौशल्य पणाला लावणाऱ्या नानासाहेब पेशवे यांच्यासंबंधीचं चरित्र कथन उद्या, रविवारी (७ डिसेंबर) होणाऱ्या हेरिटेज वॉकमध्ये आयोजिण्यात आलं आहे.

एकवीस कलाकारांचा रंगणार चित्राविष्कार

$
0
0
बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महारोगी सेवा समिती, वरोरा संचलित डॉ. विकास बाबा आमटे निर्मित व दिग्दर्शित ‘स्वरानंदवन’ हा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.

विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर युवासेनेचा हिवाळे बिनविरोध

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या (स्टुडंटल कौन्सिल) अध्यक्षपदी युवासेनेच्या मयूर हिवाळे याची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यार्थी परिषदेची निवडणूक घेतली जात नसल्याबद्दल विद्यार्थ्यांकडून टीका केली जात होती.

बँकांच्या संपामुळे अर्थव्यवहार विस्कळीत

$
0
0
बँक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या विभागीय संपाचा शेवट शुक्रवारी झाल्यानंतर, आता आंदोलनाची पुढील दिशा मुंबई येथे होणाऱ्या सर्व संघटनांच्या बैठकीत ठरविली जाणार आहे.

जलनिःस्सारण नलिका सफाईसाठी दोन कोटी

$
0
0
शहरातील ‘अ’ आणि ‘ई’ प्रभागातील जलनिःस्सारण नलिकांच्या साफसफाईसाठी दोन कोटींचा खर्च येणार आहे. तब्बल ३५ टक्के कमी दराची निविदा भरणाऱ्या ठेकेदाराला वार्षिक साफसफाईचे कंत्राट दिले जाणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images