Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘मुळशी’: ५ TMC पाण्याची मागणी

$
0
0
शहराचा वाढता विस्तार पाहता महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी मुळशी धरणातून शहरला पाच टीएमसी पाणी द्यावे. तसेच, शहरातील कचराप्रश्न सोडविण्यासाठी मोशी येथील सरकारी खाणीची जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले.

पुण्यासाठी नवे ‘CM’ वेळ देणार?

$
0
0
भारतीय जनता पक्षावर ‘शत-प्रतिशत’ विश्वास दाखविणाऱ्या पुणेकरांच्या कचऱ्यापासून विमानतळापर्यंतच्या दीर्घकाळ रेंगाळलेल्या समस्यांवर तोडगा शोधण्यासाठी नवीन मुख्यमंत्री पुरेसा वेळ व प्राधान्य देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दौंडमधील मका पिकाला अवकाळी पावसाचा लाभच

$
0
0
दौंड तालुक्यात उसाचे व रब्बी ज्वारीचे क्षेत्र जास्त असल्याने अवकाळी पावसाचा मका या चारा पिकाला लाभच होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी प्रदीप घाडगे यांनी दिली.

कोल्हे दाम्पत्याच्या मदतीसाठी ‘राजहंस’ची अनोखी योजना

$
0
0
मेळघाटामधील बैरागड येथे राहून तेथील लोकांसाठी काम करणाऱ्या डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांच्याबद्दल नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘मेळघाटावरील मोहोर’ या पुस्तकाला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

बिबट्याचा पुन्हा पायरव

$
0
0
कात्रज डेअरी मागील वंडरसिटी सोसायटीत बिबट्या दिसल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री शामाप्रसाद सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने बिबट्या दिसल्याचा दावा केला.

‘म्हाडा’च्या अटी पूर्ण केल्यास हस्तांतर सुलभ

$
0
0
सदनिकाधारकांनी ‘म्हाडा’च्या सर्व अटी पूर्ण केल्या, तर नगर-भूमापन विभागास ना हरकत प्रमाणपत्र देऊन ती मालमत्ता सदनिकाधारकाच्या नावे अभिहस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुलभतेने करणे शक्य होईल.

खडकी आयुक्त विभागात आणखी २ पोलिस ठाणी

$
0
0
येरवडा हद्दीतून चंदननगर, तर विश्रांतवाडी हद्दीचे विभाजन होऊन दिघी अशी दोन नवीन पोलिस ठाणी नुकतीच सुरू झाली. त्यामुळे खडकी सहायक पोलिस आयुक्त विभागात चारऐवजी सहा पोलिस ठाणी झाली आहेत.

भोरमधील मिळकतधारकांवर आता ३० टक्के घरपट्टीवाढीचा बोजा

$
0
0
भोर नगरपरीषदेने २०१४-१५ ते २०१७-१८ या कालावधीसाठी तयार केलेल्या कर आकारणीत सरासरी २५ ते ३० टक्के घरपट्टीवाढीचा बोजा मिळकतधारकांना सहन करावा लागणार आहे.

ऊसदरासाठी संघर्ष यात्रा

$
0
0
उसाला प्रति टन साडेतीन हजार उचल घेतल्याशिवाय आंदोलनातून माघार न घेण्याचा निर्धार शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी मंगळवारी किल्ले शिवनेरीवर केला. शिवनेरी ते साखर आयुक्त कार्यालय या शेतकरी संघटनेच्या ऊसदर संघर्ष यात्रेला शिवनेरीवरून प्रारंभ झाला; त्या वेळी ते बोलत होते.

व्ही. व्ही. मुजुमदार यांना फ्रान्सचा नाइटहूड सन्मान

$
0
0
आलियान्स फ्रॉन्साइज डी पूना या संस्थेला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमात संस्थेचे माजी अध्यक्ष आणि उद्योजक व्ही. व्ही. मुजुमदार यांना ‘फ्रेंच नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट’ या सन्मानाने गौरविण्यात आले.

दहावी-बारावीचा निकाल जाहीर

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या परीक्षांचे निकाल मंगळवारी ऑनलाइन जाहीर झाले. यंदा दहावीच्या ऑक्टोबरच्या परीक्षेचा निकाल २९.२५ टक्के, तर बारावीचा निकाल २६.७७ टक्के लागल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

नागरी समस्यांचा कोंडमारा

$
0
0
गजबजलेली वस्ती आणि मोकळा श्वास घेण्यासाठीही शिल्लक राहिली नसलेली जागा यामुळे वॉर्ड क्रमांक तीन कायम नागरी समस्यांनी ग्रासलेला आहे. भोपळे चौक ही या वॉर्डाची ओळख बनली आहे.

पोलिसमामांनी ‘तिला’ सोपवले पालकांकडे

$
0
0
पोलिसांनी केलेल्या प्रयत्नामुळे रस्ता चुकलेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीची आणि तिच्या पालकांची पुन्हा भेट झाली. मंगळवारी ( २५ नोव्हेंबर) सकाळी अकराच्या सुमारास चिंचवड येथील दगडोबा चौकामध्ये ही घटना घडली. वैष्णवी शंकर बंडगर (वय ३) असे तिचे नाव आहे.

विकास, उत्पन्नाचे मुद्दे गाजणार

$
0
0
रेडझोनच्या पट्ट्यात देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाचा तब्बल ९५ टक्के भाग मोडतो. त्यामुळे विकास खुंटला आणि उत्पन्न कमी झाले असून, यंदाच्या निवडणूकीत हाच मुद्दा प्रचारात गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

तारांगणावर शिक्का

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी (ता. २५) झालेल्या बैठकीत बहुचर्चित तारांगण उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीलाच पोलिसी ‘खाक्या’चा फटका

$
0
0
पोलिस ठाण्यात तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे अनेक प्रकार दररोज घडत असतात. असाच एक प्रकार, कोथरूड पोलिस ठाण्यात घडला असून तोही एका पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीबाबत.

महिलांच्या सुरक्षेसाठी हवे तंत्रज्ञान

$
0
0
‘कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या महिलाच नाही, तर सर्व क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला हवा. महिलांनीही स्वयंरक्षणासाठी मानसिक दृष्टीने कणखर असायला हवे,’ असे विचार नॅसकॉमतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल

$
0
0
एकाच रूममध्ये राहणाऱ्या मित्रांमध्ये असलेल्या वादातून एकाने विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सदाशिव पेठेत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घडला. विश्रामबाग पोलिसांनी तपासाअंती दोघा मित्रांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

क्रांतिवीर साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी ११ कोटी मंजूर

$
0
0
येरवड्यात क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे स्मारकाची पाच एकर जागा संपादित करण्यासाठी ११ कोटी रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या स्मारकाच्या उभारणीतील प्रमुख अडथळा दूर झाला आहे.

दहशतवाद्यांचा खात्मा अन् कामगिरी फत्ते....

$
0
0
एका गावातील दोन तीन घरांमध्ये लपलेले १३ सशस्त्र दहशतवादी... वर घरघरणारी हेलिकॉप्टर्स... दोरीच्या साहाय्याने त्यातून उतरलेले भारत आणि चीनचे लष्करी जवान... गावाची पाहणी करून सुरू असलेले डावपेच... आणि अवघ्या काही वेळातच एकाला जिवंत पकडून तर इतरांचा खात्मा करत कामगिरी फत्ते....
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images