Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तर फी वाढ होणार नाही

$
0
0
राज्यातील शाळांनी येत्या महिनाभरात शुल्क नियंत्रण कायद्याच्या तरतुदींनुसार फी निश्चितीची प्रक्रिया न केल्यास, पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळांना कोणतीही फी वाढ करू देणार नसल्याचा इशारा राज्याचे शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी सोमवारी दिला.

विद्यापीठात धुडगूस घालणाऱ्या टोळीला अटक

$
0
0
पूर्ववैमनस्यातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हॉकी स्टिक आणि तलवारीने हल्ला करून एकाला जखमी करून धुडगूस घालणाऱ्या टोळक्यातील चौघांना चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे.

नियमबाह्य गर्भपात करणाऱ्या डॉक्टरवर पालिकेची मेहेरनजर?

$
0
0
नियम धाब्यावर बसवून गर्भपात केल्याचा प्रकार शंकरशेठ रोडवरील मीरा हॉस्पिटलमध्ये उघडकीस आला आहे. गर्भपात करण्यासाठी वीस आठवड्यांची मुदत असताना हॉस्पिटलमध्ये २१ आठवड्यानंतरच्या गर्भाचा गर्भपात करण्यात आला आहे.

थेऊरजवळ कंटेनरला आग; दोघांचा मृत्यू

$
0
0
रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर कंटेनर आदळल्यामुळे लागलेल्या आगीत कंटेनरचा चालक आणि क्लिनरचा होरपळून मृत्यू झाला. रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पुणे- सोलापूर रस्त्यावरील थेऊर फाट्याजवळील कुंजीरवाडी परिसरात ही घटना घडली.

कात्रजला भरदिवसा गोळ्या झाडून खून

$
0
0
राजकीय वैमनस्यातून हडपसरजवळील होळकरवाडीच्या सरपंचाच्या मुलाचा सोमवारी भरदिवसा गोळ्या झाडून खून करण्यात आला. कात्रज येथील राजस सोसायटी येथे ही घटना घडली. नितीन बाळासाहेब झांबरे (वय २६, रा. होळकरवाडी) याचा खून करण्यात आला आहे.

मुदतीनंतरही निवडणूक न घेतल्यास फौजदारी

$
0
0
मुदत समाप्त झाल्यानंतरही संचालक मंडळांच्या निवडणुकांचा न प्रस्ताव देणाऱ्या सहकारी संस्थांचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

नऱ्हे इमारत दुर्घटना; एकाला अटकपूर्व जामीन

$
0
0
पिताराम कॉम्पलेक्स इमारत कोसळल्याप्रकरणी आरसीसी कॉन्ट्रॅक्टर दत्तात्रय कंधारे यांना कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. तिवारी यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

घोरपडीतील रस्ताही लष्कराकडून बंद

$
0
0
लष्कर विभागाकडून घोरपडीकडे जाणारे तीन रस्ते बंद करण्यात आल्यानंतर आता घोरपडी बाजारमधील ​मिरज रेल्वे मार्गावरील गेट क्रमांक एक ते सेंट जोसेफ चर्च हा रस्ता कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.

पंत गेले आणि राव आले !

$
0
0
निवडणुकांच्या लोकशाही प्रक्रियेला ठेंगा दाखवून राज्यातील मार्केट कमिट्यांवर पक्षाच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याची आघाडी सरकारचीच ‘परंपरा’ पुढे चालविण्याचा नव्या भाजप सरकारचा बेत असल्याचे समजते.

PMP चे विभाजन रोखा

$
0
0
प्रवाशांना पुरेशा सेवा-सुविधा देण्यात सात वर्षांनंतरही पीएमपी कमी पडत आहे. त्यामुळे कंपनीचे विभाजन करण्यासाठी राजकीय दबाव वाढत असला, तरी प्रवाशांच्या हितासाठी हे विभाजन न करण्याची विनंती शहरातील स्वयंसेवी संस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

पुण्यासह राज्यभर थंडीचे पुनरागमन

$
0
0
पुण्यासह राज्यात थंडीचा श्रीगणेशा झाला असून, सोमवारी पुण्यात १४.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद गोंदिया येथे (११.२ अंश सेल्सियस) झाली. पुढील तीन ते चार दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

‘टीपी’मध्ये बांधकाम परवानगी नको

$
0
0
महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांच्या विकास आराखड्यात (डीपी) १,२०० ते १,५०० एकर जमीन अद्यापही मोकळी असल्याने येथे नगररचना (टीपी) स्किम राबविण्याचा विचार सुरू आहे.

प्राणी संग्रहालयाचे ऑनलाइन तिकीट

$
0
0
महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘हेरिटेज वॉक’मध्ये सहभागी व्हायचे आहे अथवा राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला भेट द्यायची असल्यास ‘ऑनलाइन तिकीट’ काढण्याची सोय लवकरच उपलब्ध होणार आहे.

LBT रद्द करण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत

$
0
0
‘एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने सत्तेत आल्यावर दिलेला शब्द पाळावा. येत्या ३१ डिसेंबरपूर्वी कोणताही पर्याय कर लागू न करता एलबीटी रद्द करावी,’ अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने केली आहे.

‘पीएचडी’ केलेल्यांवर पगारवाढीची खैरात नको

$
0
0
‘अलीकडे पगारवाढीसाठी पीएचडी करू लागले आहेत. त्यामुळे ‘उदंड जाहले संशोधक’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संशोधनाच्या प्रांतातील आदर्शांचे स्खलन होत असून, पीएचडी केलेल्यांना पगारवाढ देण्याची पद्धत यूजीसीने बंद करावी,’ अशी टीका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. यु. म. पठाण यांनी केली.

साध्या वेशातील पोलिस, शैक्षणिक-कॉर्पोरेट कारवाई!

$
0
0
पुण्यातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटपासून (आयआयएम), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीपर्यंतच्या (आयआयटी) तज्ज्ञांनी अनेक उपाययोजना सुचवून पाहिल्या.

लाचखोरीत ‘महसूल’ची आघाडी

$
0
0
सरकारी कार्यालयांत नागरिकांची कामे करून देण्यासाठी लाच घेण्यात राज्यात यंदाही महसूल खाते ‘प्रथम’ क्रमांकावर असून, खाकी वर्दीवाल्यांनी ‘दुसरा’ क्रमांक पटकाविला आहे.

गर्भपाताची मर्यादा आता २४ आठवडे

$
0
0
व्यंग असलेले अपत्य जन्माला येऊ नये, यासाठी गर्भपाताची मर्यादा २० ऐवजी २४ आठवड्यांपर्यंत करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहेत. त्यासाठी कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव देखील सादर केला आहे.

सत्ता सोडली, राजकारण नाही

$
0
0
दिल्लीमध्ये ‘आप’चे सरकार स्थापन झाल्यानंतरच्या टप्प्यावर सत्ता सोडली असली, तरी राजकारण सोडण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचे ‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी स्पष्ट केले.

१० वी, १२ वी चा आज निकाल

$
0
0
दहावी आणि बारावीच्या नुकत्याच झालेल्या ऑक्टोबरच्या परीक्षांचे निकाल मंगळवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी ऑनलाइन जाहीर होणार आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे www.mahresult.nic.in या वेबसाइटवर दुपारी १ वाजल्यापासून हे निकाल उपलब्ध करून दिले जाणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images