Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मुख्यमंत्र्यांचे पुण्यावर लक्ष

$
0
0
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात प्रलंबित राहिलेले प्रकल्प कमीत कमी वेळेत कसे पूर्ण करता येतील, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: लक्ष घालणार आहेत. गेल्या पाच वर्षांत शहरात सुरू करण्यात आलेल्या आणि सध्या अपूर्ण असलेल्या प्रकल्पांची माहिती गोळा करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.

नावळीतील निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व

$
0
0
पुरंदर तालुक्यातील तीन ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांमध्ये शिवसेनेने नावळी येथील सातपैकी सात जागा जिंकून वर्चस्व राखले आहे. धनकवडी येथील निवडणुकीत चार पैकी तीन जागांवर शिवसेनेचा विजय झाला असून, एक जागा रिक्त आहे.

कारखाली सापडून बालकाचा मृत्यू

$
0
0
कार मागे घेताना गंभीर जखमी झालेल्या दीड वर्षाच्या बालकाचा रविवारी मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी चंदन नगर पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. अर्णव अजय पायाळ (वय दीड वर्ष, रा. गुलमोहर सोसायटी) असे या बालकाचे नाव आहे.

वसा नदी स्वच्छतेचा

$
0
0
दौंड शहराजवळून वाहणाऱ्या भीमा नदीचे पात्र आपल्या परीने स्वच्छ करण्याचे काम एक तरुण सातत्याने चार वर्ष करतो आहे. एकीकडे शेकडो हात नदीत नित्यनेमाने कचरा, निर्माल्य, नको असलेले कपडे,प्लास्टिक नदीला अर्पण करून जात असतात.

निर्मल ग्राम मोहिमेत पुरंदर पिछाडीवर

$
0
0
निर्मल ग्राम अभियानात पुणे जिल्ह्यात ८० टक्के काम झाले असले, तरी त्या तुलनेत पुरंदर तालुका खूपच मागे पडला आहे. पुरंदरमध्ये केवळ ७२ टक्केच काम झाले आहे.

‘पुन्हा भगवी लाट उसळू द्या’

$
0
0
‘येत्या पोटनिवडणुकीत काळेबोराटेनगर-महंमदवाडी प्रभागातून पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकावून दाखवणारच. आता कोणत्याही लाटेचा विचार करू नका, परत एकदा भगवी लाट उसळू द्या,’ असे आवाहन शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना माजी आमदार महादेव बाबर यांनी केले.

छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंचा बंदोबस्त

$
0
0
साधना शाळा आणि कॉलेज मुलीची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंची तक्रार शालेय आणि कॉलेज विद्यार्थिनींनी दिल्यावर तेरा रोडरोमिओंना पोलिसांनी चोप दिला आहे. त्यांच्याकडील आठ बुलेट ताब्यात घेऊन सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

हातगाड्यांचे रस्ते, पार्किंग झोनचा पत्ताच नाही

$
0
0
रस्त्यावर उभे रहायलाही मोकळी जागा नसलेला परिसर म्हणजे वॉर्ड क्रमांक दोन. भौगोलिकदृष्ट्या कमी क्षेत्रफळ असलेला; पण दाट लोकवस्तीच्या या वॉर्डात गर्दी करणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. शिवाजी मार्केट प्रमुख बाजाराचे ठिकाण, हातगाडी आणि पथारीवाल्यांनी व्यापलेले रस्ते, पार्किंग झोन अस्तित्त्वात नाही.

संमेलनाध्यक्ष निवडणुकीत मतदारच उदासीन

$
0
0
साहित्य संमेलनाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील मतदानामध्ये मतदारांचे औदासीन्य दिसून येत आहे. आतापर्यंत केवळ २६ टक्केच मतपत्रिका निर्वाचन अधिकाऱ्यांकडे पोहोचल्या असून, ९ डिसेंबरपर्यंत मतपत्रिका स्वीकारल्या जाणार आहेत.

घुमान संमेलनाची पाकमध्येही उत्सुकता

$
0
0
मराठी साम्राज्याचा झेंडा अटकेपार पोहोचला होता. आता त्याच अटकेजवळ घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयीची सीमेपार पाकिस्तानात उत्सुकता निर्माण झाली असून, पाकिस्तानातील कराची येथून काही मराठी माणसे साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

प्रशासकीय मंडळ आज बरखास्त?

$
0
0
पुणे प्रादेशिक आणि हवेली बाजार समितीवर नियुक्त केलेले प्रशासकीय मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी शरद जोशी विचार मंचाच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. या प्रकरणावर आज (मंगळवारी) पणन संचालकांकडे सुनावणी होणार आहे.

लोणावळ्याजवळ रिक्षाचालकाचा खून

$
0
0
लोणावळ्याजवळील डोंगरगाव येथे अज्ञात व्यक्तीने एका रिक्षाचालकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना नुकतीच घडली आहे. वसंत बारकू हरिश्चंद्रे (वय ७०, रा. ओळकाईवाडी, कुसगाव) असे रिक्षाचालकाचे नाव आहे.

हैद्राबाद एक्स्प्रेसमध्ये लॅपटॉप चोरणाऱ्यास अटक

$
0
0
हैद्राबाद एक्स्प्रेसमध्ये लॅपटॉप चोरणाऱ्यास रेल्वे पोलिसांनी भोसरी बसस्थानकावर सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक मोबाइल आणि लॅपटॉप असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मैदानात खुलेआम चालणाऱ्या मटका अड्ड्यांवर पोलिसांचा छापा

$
0
0
मैदानात खुलेआम चालणाऱ्या मटका अड्ड्यांवर सांगवी पोलिसांनी छापा टाकला. शनिवारी (ता. २२) सायंकाळी काटेपूरम चौक आणि गोविंद गार्डन चौकात या दोन्ही कारवाया करण्यात आल्या.

खडकी कँटोन्मेंटची पुरवणी मतदार यादी प्रसिद्ध

$
0
0
खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या जानेवारी २०१५ मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी पुरवणी मतदारयादी सोमवारी (२४ नोव्हेंबर) प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर हरकती आणि सुचना मागवून अंतिम पुरवणी यादी जाहीर करण्यात येणार आहे.

तिकिट मिळण्याच्या खात्रीने विद्यमानांची प्रचारात आघाडी

$
0
0
खडकीखडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी मिळणार असल्याने त्या सर्वांनी उमेदवारी जाहीर होण्याची वाट न बघता कामाला सुरवात केली आहे.

पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष मुख्यमंत्र्यांकडे

$
0
0
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वादग्रस्त ठरलेला पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, भामा-आंद्राच्या पाण्याची २१७ कोटींची थकबाकी, कत्तलखाना, अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, एलबीटी, जेएनएनयुआरएमअंतर्गतचे अर्धवट प्रकल्प या सारख्या शहरातील महत्त्वाच्या आणि प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष देणार का, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

मान्यतेसाठी २३३ शाळांनी दिली खोटी कागदपत्रे

$
0
0
राज्यातील २२३ शाळांनी सरकारी मान्यतेसाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे, तर ७० शाळांनी चुकीची माहिती दिल्याचे शिक्षण खात्याच्या तपासणीतून उघड झाले आहे. पुणे विभागातील खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या २४ आणि चुकीची माहिती देणाऱ्या १६ शाळांनाही या प्रक्रियेत मान्यतेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

ऑनलाइन वेळापत्रकात अचानक बदलाचा ‘व्हायरस’

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने इंजिनीअरिंगच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या प्रॅक्टिकल आणि ऑनलाइन परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये अचानक बदल केल्याचे उघड झाले आहे.

फी वाढीच्या विरोधात ‘MIT’त आंदोलन

$
0
0
एमआयटी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील फी वाढीच्या विरोधात पालकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. शाळेने विद्यार्थ्यांनाच त्रास दिल्यास आणि पालकांचे आंदोलन गांभीर्याने न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही पालकांनी दिला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images