Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भारत, चीन लष्करात काही बाबतीत मतभेद

$
0
0
‘भारत आणि चीन यांच्यात काही बाबतीत मतभेद आहेत. ते मतभेद लपविण्यापेक्षा परस्पर सामंजस्यातून चर्चा करून सोडविण्याचा चीनचा प्रयत्न असेल,’ असे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे लेफ्टनंट जनरल झोऊ शोझाव यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

उलगडला २६/११च्या हल्ल्याच्या तपासाचा पट

$
0
0
मुंबईवर २६/११चा दहशतवादी हल्ला... पुढील काही दिवस ९८ पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेला अथक तपास... सुमारे बारा हजार पानांचे आरोपपत्र... तपासणी आणि उलटतपासणी... कसाबला फाशी देण्याचे ऑपरेशन... असा मुंबई हल्ल्यानंतरच्या तपासाचा थरारक पट, प्रकरणाचे तपास अधिकारी रमेश महाले यांनी उलगडला.

राज्यघटनेची ६५ वर्षे

$
0
0
देशात १५ ऑगस्ट व २६ जानेवारी हे दोन्ही दिवस साजरे केले जातात. मात्र, २६ नोव्हेंबरची आठवण कोणालाच नसते. तरी, हा दिवस आपल्या घटनेच्या इतिहासात महत्त्वाचा आहे. याच दिवशी ६५ वर्षांपूर्वी जवळपास ३ वर्षांच्या घटनाकारांच्या अथक परिश्रमांची फलश्रुती झाली.

विद्यापीठांनी उभारावी तक्रार यंत्रणा

$
0
0
राज्यातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर अत्यंत प्रभावी तक्रार निवारण यंत्रणेची उभारणी करण्याचे आवाहन राज्यपाल आणि कुलपती सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी पुण्यात केले.

विद्यापीठात साकारतेय ‘सायन्स रिसोर्स सेंटर’

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील ब्रिटिशकालीन तळ्याच्या परिसरात एखादी जैवविविधतेने नटलेली परिसंस्था उभी राहिली, तर आता नवल वाटायला नको. विद्यापीठाच्या प्रस्तावित ‘सायन्स रिसोर्स सेंटर’च्या माध्यमातून विद्यापीठाने अशा कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पावले उचलली आहेत.

जनतेला सन्मानाने वागवा

$
0
0
‘पोलिसांना समाजाचा पाठिंबा मिळवायचा असेल तर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास आलेल्या तक्रारदाराला आदराने वागवले पाहिजे. तसेच त्याची तक्रार तत्काळ दाखल केली पाहिजे,’ अशी अपेक्षा कारागृह विभागाच्या प्रमुख आणि अप्पर पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केली.

साखळीचोरीचे ‘खरे लाभार्थी’ फिरतात उजळ माथ्याने

$
0
0
राज्यात गेल्या वर्षभरात सोनसाखळी चोरांनी ३५ कोटी २३ लाख ४४ हजार रुपयांचे दागिने हिसकावले आहेत. सोनसाखळी चोरीचा सर्वाधिक फायदा होणाऱ्या खऱ्या गुन्हेगारांची माहिती, सोनसाखळी चोर आणि त्यांच्या खबऱ्यांकडून लपवण्यात येत असल्याने ‘त्या’ गुन्हेगारांचे फावत असल्याचे निरीक्षण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अहवालात नोंदविले आहे.

‘Ph D’चा दर्जा सुधारण्यासाठी हवी चळवळ

$
0
0
विद्यापीठांमधील ‘पीएचडी’च्या दर्जाविषयी माजी कुलगुरू डॉ. यु. म. पठाण यांनी केलेल्या टीकेवर शिक्षणविश्वातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज, शिक्षणविश्वातून ‘मटा’कडे व्यक्त करण्यात येत आहे.

कमी दर्जाचा माल ठेवणाऱ्या मिठाई विक्रेत्यांवर कारवाई

$
0
0
दिवाळी दरम्यान मिठाई विक्रेत्यांसह खाद्य पदार्थांच्या २१७ ठिकाणी घेतलेल्या नमुन्यांमध्ये लाडूसह शेवच्या नमुन्यांमध्ये प्रमाणापेक्षा खाद्यरंग आढळले आहे. त्या प्रकरणी मिठाई विक्रेत्यांवर खटले दाखल करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामुळे पॉलिटेक्निक परीक्षेत गोंधळ

$
0
0
गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असतानाही, पॉलिटेक्निकच्या ग्राउंडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला परवानगी दिल्याने पॉलिटेक्निकच्या आवारात मंगळवारी सकाळी गोंधळ झाला.

मुलीला पळविले : दोघांना पोलिस कोठडी

$
0
0
एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन अप्पर इंदिरानगर येथील शेळकेवस्तीतील एका खोलीतील बाथरूमच्या पोटमाळ्यावर डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तिच्यावर अत्याचार करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

भूसंपादनासाठी पालिकेला हवे अनुदान

$
0
0
केंद्र सरकारच्या नव्या भूसंपादन कायद्यामुळे आरक्षित जागा ताब्यात घेताना पालिकेला कोट्यवधींचा भुर्दंड सोसावा लागणार असल्याने ‘जेएनएनयूआरएम’च्या धर्तीवर भूसंपादनासाठी केंद्र व राज्य सरकारने निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.

शुल्क नियंत्रण कायद्याची डोकेदुखी

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यापाठोपाठ (आरटीई) शुल्क नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी शहरातील शाळांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. एकीकडे ‘आरटीई’मधील २५ टक्के आरक्षित प्रवेशांसाठीच्या परताव्यासाठीचा लढा, तर दुसरीकडे नवे शुल्क ठरविण्यासाठीच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे आव्हान शहरातील शाळांसमोर उभे ठाकले आहे.

कात्रजचा चौक मोकळा श्वास घेणार कधी?

$
0
0
पुण्याहून साताऱ्याकडे जाताना कात्रजच्या चौकात चहूबाजूने ये-जा करणाऱ्या एसटीसह जड वाहनांच्या गर्दीत पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीचे सतत कोंडी होते.

अनधिकृत बांधकामांचा अहवाल द्या

$
0
0
अनधिकृत बांधकामासंदर्भात स्थापन केलेल्या समितीचा अहवाल कालबद्ध मर्यादेत सादर करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना मंगळवारी दिले.

राज्याचे नुकसान सोसून LBT रद्द करणार नाही

$
0
0
सत्तेवर येताच एलबीटी रद्द करण्याचे लेखी आश्वासन ‘फॅम’ला (फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र) ला देणाऱ्या भाजपने आता कोलाटउडी मारली आहे. एलबीटी रद्द करण्यासाठी पर्यायांचा विचार सुरू आहे. मात्र, राज्याचे नुकसान करून एलबीटी रद्द केली जाणार नाही, व्यापाऱ्यांनीही याचा विचार करावा,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

मेट्रो प्रकल्प तातडीने व्हायला हवा

$
0
0
मेट्रो प्रकल्पासंदर्भात वेगवेगळी मते आहेत, ती समजावून घेऊन प्रकल्पाबाबत निर्णय घेऊ; मात्र पुण्यातील परिस्थिती पाहता मेट्रो प्रकल्प फार काळ प्रलंबित ठेवता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मांडली.

पुणेकरांच्या माथी पुन्हा कचराकोंडी

$
0
0
महापालिकेने उरळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांना दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप करून पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांन‌ी दिला.

सोळाशे कलावंतांचे मानधन रखडले

$
0
0
राज्य शासनाकडून देण्यात येणारे विविध क्षेत्रातील वृद्ध कलावंतांचे मासिक मानधन पुणे जिल्ह्यासह राज्यातही गेल्या चार महिन्यांपासून रखडले आहे. चित्रपट, नाटक, अभिनय, गायन, वादन, साहित्यिक, किर्तनकार, प्रवचनकार, तमाशा, शाहीर अशा विविध क्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील सुमारे १६०० कलावंतांना गेले चार महीने दरमहा रुपये १००० मासिक मानधन मिळालेले नाही.

११ ‘नकोशी’च्या जिवावर उठले पालक

$
0
0
पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात अकरा पालकांनी मुलगी जन्माला आली म्हणून, पोटच्या गोळ्याचाच खून केल्याची धक्कादायक माहिती राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या (सीआयडी) अहवालातून पुढे आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images