Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राज ठाकरे ‘भाकरी फिरवणार’

$
0
0
‘येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला पुण्यात निश्चित बदल दिसतील, काही दिवसांतच मी पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करणार आहे,’ अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील भाकरी फिरविण्याचा इरादा शनिवारी स्पष्ट केला.

पोलिस लावणार झेब्रा क्रॉसिंगची शिस्त

$
0
0
वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी शहरातील विविध चौकांमधील झेब्रा क्रॉसिंगवर दोऱ्या धरण्याचा उपक्रम वाहतूक पोलिसांनी हाती घेतला आहे. वाहतुकीची कोंडी हा गेल्या काही वर्षांत शहर व परिसरातील भीषण प्रश्न बनला आहे.

रखडलेल्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री सरसावले

$
0
0
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या कालखंडात ‘बाबा-दादां’च्या दुर्लक्षामुळे रखडलेले शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रश्न सोडविण्यासाठी नव्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे.

टू व्हीलरची अचानक तपासणी

$
0
0
टू व्हीलरमध्ये स्फोटके पेरून स्फोट घडवून आणण्याची शक्यता गृहीत धरून गुन्हे शाखेने रस्त्यांवर पार्क केलेल्या टू व्हीलरची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. फर्ग्युसन रोडसारख्या संवेदनशील रस्त्यांवरील पार्किंगमध्ये पार्क असलेल्या टू व्हीलरची अचानक तपासणी करण्यात येत आहे.

‘KG ते PG मोफत शिक्षण द्या’

$
0
0
शिक्षणाच्या बाजारीकरणाला विरोध करत अखिल भारतीय शिक्षण अधिकार मंचाने शनिवारी पुण्यात मोर्चा काढला होता. भिडे वाड्यापासून मंडईपर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये केजी ते पीजीच्या मोफत शिक्षणाच्या मागणीसोबतच जातीवाद आणि भेदभाव शिकविणारे शिक्षण मोडीत काढण्याची मागणी करण्यात आली.

जंगलपट्ट्यासाठी ३० हजार कोटी

$
0
0
विविध राज्यांमध्ये जंगले वाढविण्यासाठी तीस हजार कोटी रुपयांचा निधी तातडीने राज्यांकडे सुपूर्द करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी दिली.

रेल्वेत नोकरी : आमिषाने फसवणूक

$
0
0
रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या पिता-पुत्राला खडक पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी तिघांची सुमारे साडे सात लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या दोघांनाही कोर्टाने २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

होर्डिंग लावल्यास पद रद्द

$
0
0
आपल्या वाढदिवसाचे होर्डिंग लावणारा राज्यातील कोणीही दुसऱ्या दिवशी पक्षात नसेल, असा सणसणीत दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना भरला. मते मिळविण्याच्या मागे लागण्यापेक्षा लोकांची मने जिंका, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना महिनाभर थांबावे लागणार

$
0
0
आरोग्य खात्यातील कीटक प्रतिबंधक विभागातील चतुर्थ श्रेणीमधील ३१३ कर्मचाऱ्यांना लाड आणि पागे समितीच्या शिफारसी प्रमाणे घाणभत्ता, धुलाईभत्ता आणि वारसा हक्क लागू करण्याचा प्रस्ताव एक महिना पुढे ढकलण्यात आला.

दुचाकी चोरटा गजाआड

$
0
0
नेहरू रोडवरील सोनमार्ग टॉकीज परिसरात खडक पोलिसांनी एका वाहन चोराला अटक केली असून त्याच्या ताब्यातून चोरीच्या सात दुचाकी आणि लॅपटॉपसह दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

इनामदार हॉस्पिटलबाबत महापालिकेची चुप्पी ?

$
0
0
बेकायदा बांधकाम करून त्याचा बिनधास्तपणे वापर करणाऱ्या वानवडी येथील इनामदार हॉस्पिटलला महापालिका प्रशासन किती दिवस पाठीशी घालणार, असा प्रश्न सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात‌ आला.

‘भामा-आसखेड’ रखडण्याचा धोका

$
0
0
भामा आसखेड प्रकल्पातून पाणी घेताना महापालिकेने ‘सिंचन पुनर्स्थापना’ खर्चापोटी १०० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेकडे केली आहे.

बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील ५४० डॉक्टरांना सेवेत घ्या

$
0
0
संपावर गेल्याच्या कारणास्तव पाच महिन्यांपासून निलंबित केलेल्या बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) काम करणाऱ्या ५४० डॉक्टरांना अखेर वैद्यकीय सेवेत रुजू करून घ्या, असे स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.

१० टक्के सफाई कर्मचाऱ्यांत फुफ्फुसाची क्षमता कमीच

$
0
0
पुणेकरांच्या आरोग्यासाठी स्वतःचे आरोग्य धुळीत टाकून रस्त्यांची साफसफाई करणाऱ्या विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांतील दहा टक्के अर्थात सुमारे ५० कर्मचाऱ्यांच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता खालावल्याचे दिसून आले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित प्रश्न मार्गी लावा

$
0
0
‘केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित प्रश्नांबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे,’ अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

भाजपमध्ये निर्णय होत नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता

$
0
0
देशात आणि राज्यात सत्ता मिळाल्यामुळे भाजपला खडकी कँटोन्मेंट बोर्डामध्येही एकहाती सत्ता हवी आहे. त्यासाठी उमेदवाराची निवड करताना बारकाव्यांचा विचार केला जात आहे. त्यामुळे निर्णय घेण्यास उशीर होत असल्याने पक्षातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

‘इबोला’ रोखण्यासाठी समुद्रमार्गांवर ‘नजर’

$
0
0
भारतात ‘इबोला’चा पेशंट आढळल्याने पुणे-मुंबईच्या विमानतळाप्रमाणेच आता राज्यातील समुद्रमार्गे परदेशातून येणाऱ्या जहाजांवर आरोग्य खात्याने आपली ‘नजर’ ठेवली आहे. जहाजातून येणाऱ्या परदेशी पर्यटकांना प्रवाशांची तपासणी करण्यासाठी बारा ठिकाणी केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.

पिंपरीतील विद्यार्थी मृत्यूप्रकरणी महापालिकेचा खुलासा

$
0
0
गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या भांडणात हृषीकेश सरोदे या महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची दखल घेऊन राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने राज्य सरकारला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

फायनान्स कंपनीमार्फत लाखोंची फसवणूक

$
0
0
चांगल्या व्याजाचे आमिष दाखवून फायनान्स कंपनीमार्फत अनेक गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी सुमारे २ लाख ११ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

सोनसाखळीचोरांची पोलिसांना सलामी

$
0
0
चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणवर सोनसाखळीचोरी आणि घरफोड्या रोखण्याचे आव्हान असतानाच उद‍्घाटनच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी वडगांव शेरी परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images