Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बारवनगर गावाच्या पाणीपुरवठ्याचे तीनतेरा

$
0
0
अंजनगाव परिसरातील बारवनगरसाठी २००८ मध्ये साडेबत्तीस लाख रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. योजना पूर्ण झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखापरीक्षण पत्रकात पाणीपुरवठा समिती आणि पंचायत समितीच्या अभियंत्यांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

भोरमधील समस्या ‘जैसे थे’च

$
0
0
भोर विधानसभा मतदार संघ गेली चार दशके थोपटे पिता-पुत्राच्यामागे भक्कमपणे व एकनिष्ठेने उभा राहिला. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात सत्तेत असणाऱ्या आघडी सरकारमध्येही त्यांचा सहभाग होता.

पर्यावरणासाठी काम करण्याऱ्यांची हेटाळणी

$
0
0
पर्यावरणाबाबत लोकांना फारसे प्रेम नाही. फार थोडे लोक पक्षी, प्राणी, वने याच्या संवर्धनासाठी कार्यरत असून या क्षेत्रात काम करणाऱ्यांची हेटाळणी केली जाते, अशी खंत पक्षीतज्ज्ञ बी. एस. कुलकर्णी यांनी रविवारी व्यक्त केली.

२.५ हजार मतदारांचे नव्याने अर्ज

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले असून, दोन हजार ५७० नागरिकांचे अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांवर २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असून, एक ​डिसेंबरला मतदार यादी अंतिम होणार आहे.

नागरी समस्यांमध्येही पहिला

$
0
0
क्वीन्स गार्डनचा शांत परिसर आणि गवळी वाड्यासारखा गजबजलेला भाग अशा दोन परस्पर विरोधी वातावरणाने बनलेल्या वॉर्ड क्रमांक एकमध्ये गेल्या सहा वर्षांत ड्रेनेज लाइनची व्यवस्था आणि फूटपाथ दुरुस्ती ही फुटकळ कामे वगळली, तर नागरी समस्यांनी ग्रासलेलाच हा वॉर्ड राहिला आहे.

बँक खाते, एलपीजी क्रमांक जोडणी आजपासून पुन्हा सुरू

$
0
0
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवरील अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेसाठी (डीबीटीएल) बँक खाते आणि एलपीजी क्रमांकाच्या जोडणीचे काम आजपासून (सोमवार) सुरू होत आहे. ग्राहकांनी तातडीने ही जोडणी करून घ्यावी, असे आवाहन कंपन्यांनी केले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सातारा रस्त्याकडे दुर्लक्ष

$
0
0
पुणे - बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील पुणे- सातारा या टप्प्यावर होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत महामार्ग पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, त्याकडे ‘एनएचएआय’ने कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.

समस्यांच्या मुळांपाशीच असतात उपाय

$
0
0
समस्यांच्या मुळांपाशीच उपाय असतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उपाय शोधण्याचा प्रयत्न करत वाटचाल केल्यास जीवनातील अशक्यप्राय वाटणारी ध्येये सहज प्राप्त होतात, असा सल्ला देताना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाताई आमटे यांनी आदिवासींसाठी केलेले काम व अत्यंत रोमांचकारी घटनांनी व्यापलेला जीवनपट उलगडला.

पालेभाज्या उतरल्या; काकडी, वांगी महाग

$
0
0
गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची चांगली आवक झाल्याने कोथिंबीर, मेथीचे दर उतरले आहेत. आवक घटल्यामुळे काकडी, वांगी, कांदा, बटाटा, दोडक्याचे दर थोडेसे वाढले आहेत. मार्केट यार्डात थंडीमुळे फळभाज्यांची आवक रविवारी घटली.

११ वी- १२ वी सायन्सचे पेपर पूर्वीप्रमाणेच वेगळे?

$
0
0
अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची सायन्सच्या प्रत्येक विषयाची लेखी परीक्षा पूर्वीप्रमाणेच दोन वेगवेगळ्या पेपरच्या माध्यमातून घेण्याचा प्रस्ताव राज्य बोर्डाच्या विचाराधीन आहे.

सोलापूर-ठाणे एसटीला एक्स्प्रेस वेवर अपघात

$
0
0
सोलापूरहून ठाण्याला निघालेली बस ब्रेक फेल झाल्याने लोणावळ्याजवळ उलटली. रविवारी रात्री झालेल्या या अपघातामध्ये किरकोळ जखमी झालेल्या १८ प्रवाशांना पनवेल येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

पेनल्टी पॉइंट रोखणार वाहतुकीतील बेशिस्त

$
0
0
रस्त्यावरील पोलिसांची उपस्थिती, दंडाची पावती अशा कारवायांचा धाक न उरलेल्या शहरांमधील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आता ‘पेनल्टी पॉइंट’ व्यवस्था राबविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.

२५ शेतकऱ्यांच्या पंधरवड्यात आत्महत्या

$
0
0
‘राज्यातील सत्तांतर झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मराठवाड्यात गेल्या १५ दिवसांत २५ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली.

१३.५ हजार फुटांवर ‘छत्रपती शिवराय’

$
0
0
अरुणाचल प्रदेशात तवांगजवळ तब्बल साडेतेरा हजार फूट उंचीवर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याचे काम मराठा लाइट इन्फ्रंट्रीने केले आहे. नुकतेच या पुतळ्याचे अनावरण झाले.

‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा लुटमारी

$
0
0
पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा लुटमार सत्र सुरू झाले असून रविवारी (२३ नोव्हेंबर) मध्यरात्री लोणावळा परिसरात अज्ञात दरोडेखोरांनी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून दोन गाड्या लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

७० लाखांचा ट्रॅक दुर्लक्षित

$
0
0
पुणे महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून सायकल ट्रॅकची उभारणी केली खरी; पण त्याचा वापर करणाऱ्या सायकलस्वारांची संख्या अगदीच नगण्य असल्याचे दिसून आले आहे. निवडणुकीच्या अगोदर हडपसर येथील गोंधळेनगर ते गाडीतळ मार्गावर सुमारे ७० लाख रुपये खर्चून दीड किलोमीटरचा सिंथेटिक सायकल ट्रॅक उभारण्यात आला.

घरात आढळला सातफुटी कोब्रा

$
0
0
शनिवारी दुपारी दोनची वेळ.. हिवऱ्यातील (ता. पुरंदर) घटना... येथील रहिवासी हमीद शेख यांच्या पत्नी घरातील कामात व्यग्र होत्या.. अचानक त्यांना पाण्याच्या पाइपमध्ये हालचाल जाणवली.. कशाची हालचाल आहे म्हणून जाऊन पाहिले तर काय..

स्वाभिमानी : ऊसदर आंदोलन स्थगित

$
0
0
खरेदीकर माफ करण्याचे आणि मळीवरील नियंत्रणे उठविण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराबाबतचे नियोजित आंदोलन स्थगित केले आहे.

साखर, गोटा खोबऱ्याच्या दरात घट

$
0
0
गुलटेकडीच्या मार्केट यार्डातील भुसार बाजारात मागणी अभावी साखर, नारळ, भाजकी डाळ, साबुदाणा, गोटा खोबरे, ११२१ जातीचा तांदूळ तसेच खोबरेतेलाच्या दरात घट झाली आहे. मोठ्या आकाराचा जाडा शेंगदाणा मात्र महागला आहे.

नर्सलाही गर्भपाताचे अधिकार?

$
0
0
गर्भनिरोधक औषधे अपयशी ठरली अथवा अन्य कारणाने गर्भ राहिल्यास एमबीबीएस, स्त्रीरोग तज्ज्ञ गर्भपात करतात; मात्र आता होमिओपॅथ, युनानी, आयुर्वेदाच्या डॉक्टरांसह नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांनाही तसे अधिकार देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हालचाली सुरु आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images