Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

योग व निसर्गोपचार कॉलेज स्थापण्याचे सूतोवाच

$
0
0
जमीन उपलब्ध झाल्यास निसर्गोपचार आणि योगविद्येच्या प्रसार व संशोधनासाठी पुण्यामध्ये ‘योग आणि निसर्गोपचार’ कॉलेज सुरू करण्याचे सूतोवाच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी केले.

विजय शिवतारे यांची प्रवक्त्यांच्या टीममध्ये वर्णी

$
0
0
शिवसेनेने शुक्रवारी जाहीर केलेल्या प्रवक्त्यांच्या नव्या टीममध्ये पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांची वर्णी लागली आहे; तसेच नव्यानेच पुण्याच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आलेल्या अमोल कोल्हे यांच्याकडेही प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली असल्याने उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह पुण्यातून तीन प्रवक्ते सेनेची धुरा सांभाळणार आहेत.

PMPML : भ्रष्टाचाराचे कुरण

$
0
0
शहरातील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी स्थापन करण्यात आलेली पीएमपीएमएल कंपनी ही भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. पालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा निधी देऊनही पीएमपीएमएल तोट्यातच चालत असून, याला सर्वस्वी संचालक मंडळाचा नाकर्तेपणा जबाबदार आहे.

अंत्यदर्शनासाठी ‘रज्जूचक्षू’

$
0
0
नातेवाइकाचा मृत्यू झाल्यावर अंत्यदर्शनाला जाता न आल्यास ती खंत मनात कायम बोचत राहते. मात्र, पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत झालेले अंत्यविधी आता एका क्लिकवर पाहण्याची सोय होणार आहे.

एक्स्प्रेस-वेवर अपघातात ३ ठार

$
0
0
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर उर्सेजवळ पंक्चर काढण्यासाठी सर्व्हिस लेनवर उभ्या असलेल्या मिनी टेम्पोला भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

मेट्रो मार्गातील अडथळे दूर

$
0
0
पुणे मेट्रोचा प्रस्ताव ‘पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डा’समोर (पीआयबी) सादर होण्यातील सर्व अडथळे दूर झाले असून, त्यांचे शिक्कामोर्तब होताच, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तो सादर केला जाणार आहे.

‘IIM’ गमावल्याचे पालिकेत पडसाद

$
0
0
मेट्रो प्रकल्पापाठोपाठ आयआयएमसारखा महत्त्वाच्या संस्थेबाबतही केंद्र आणि राज्य सरकारने पुण्याबाबतचा दुजाभाव दाखवला असून, भारतीय जनता पक्षाचे आठ आमदार आणि एक खासदार गप्प का आहेत, असा जोरदार हल्ला काँग्रेसने शुक्रवारी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्येच चढविला.

...तर पक्षातून बाहेर जाल: राज

$
0
0
पदाधिकारी, गटनेते, कार्यकर्ते यांच्या वाढदिवसांचे होर्डिंग लावाल तर दुसऱ्या दिवशी पक्षातून बाहेर जाल, असा दम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना भरला आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांची ‘शाळा’च घेतली.

राज ठाकरे होणार ‘कनेक्ट’

$
0
0
निवडणुकांच्या काळात हायटेक प्रचाराच्या साथीने राजकीय भाजप-शिवसेनासारख्या पक्षांनी लोकांशी जवळीक राखली. मात्र मनसे तशी हायटेक प्रचारात कमी पडली. आता मात्र मनसे अध्यक्ष यांनी ही कमी दूर करत लोकांशी, पक्षातील कार्यकर्त्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला असून आपला ई-मेल आयडी जाहीर केला आहे.

टवेरा दरीत कोसळली, ४ ठार

$
0
0
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूरजवळ टवेरा गाडीत दरीत कोसळून झालेल्या अपघातात चार जण ठार तर दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी पहाटे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या टवेरा गाडी दरीत कोसळून हा अपाघात झाल्याचे समजते.

हडपसरमध्ये तरुणीवर बलात्कार

$
0
0
हडपसर परिसरामध्ये एका तरुणीचे अपहरण करून बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली असून, आरोपी व त्याचे दोन साथीदार गायब आहेत.

देहविक्रय करणाऱ्या तरुणीची सुटका

$
0
0
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गरिबीमुळे वेश्या व्यवसायात आलेल्या कल्याण येथील एका २० वर्षांच्या तरुणीची सुटका केली. एका मैत्रिणीच्या माध्यमातून दलालाच्या मदतीने ती वेश्या व्यवसायात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

दरीत जीप कोसळून चार ठार

$
0
0
देवदर्शनाहून घरी परतत असताना पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस-वे’वर बोरघाटाच्या उतारावर सुमारे दिडशे फूट दरीत तवेरा गाडी कोसळून चार ठार आणि दोघे जखमी झाले. ही दुर्घटना शनिवारी (२३ नोव्हेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली.

जुगारात कमावले; चोरीत गमावले

$
0
0
खडकी येथून जुगार खेळून दुचाकीवर परतणाऱ्या व्यक्तीला शिवाजीनगर गावठाणातील ‘हॉटेल रिजेंट’समोर चौघा तरुणांनी लुटल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. लुटमारीची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पर्ल्सच्या गुंतवणूकदारांची पोलिस स्टेशनमध्ये तक्रार

$
0
0
पर्ल्स कंपनीत गुंतवणूक केलेल्या ५० तक्रारदारांनी डेक्कन पोलिस ठाण्यात आपले पैसे मिळवण्यासाठी तक्रारी दाखल केल्या आहेत. या कंपनीचे डेक्कन येथील कार्यालय बंद झाल्याने तक्रारदारांनी अखेर पोलिस ठाण्याची पायरी चढली आहे. सेबीकडून या कंपनीची चौकशी सुरू आहे.

‘क्रॉसपॅथी’ डॉक्टरांकडे नेत्यांनी उपचार घ्यावेत’

$
0
0
‘होमिओपॅथच्या डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा देणाऱ्या तत्कालीन काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमधील राजकीय पुढाऱ्यांनीच ‘क्रॉसपॅथी’ची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांकडून एकदा आजारांवर उपचार करून घ्यावेत,’ अशी उपहासात्मक टीका इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जितेंद्र पटेल यांनी केली.

‘कॉर्पोरेट’ हॉस्पिटलवर शुल्कांचे निर्बंध लावा

$
0
0
‘हॉस्पिटलमधून डॉक्टर मंडळी भरमसाठ फी घेत असल्याचा आरोप बिनबुडाचा असून कॉर्पोरेट खासगी मोठी हॉस्पिटलच प्रचंड शुल्क पेशंटकडून आकारतात.

‘मराठा आरक्षणाचा अध्यादेश मंजूर करा’

$
0
0
मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला त्वर‌ित मान्यता देत, त्याचे कायद्यात रूपांतर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. या मागणीसाठी राज्यभरात चळवळ उभारण्यासोबतच, येत्या ८ डिसेंबरला विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

माजी सदस्यांच्या सवलतीवर स्वयंसेवी संस्थांची टीका

$
0
0
महापालिकेच्या माजी सदस्यांना; तसेच शिक्षण मंडळ व परिवहन समितीच्या सदस्यांना १०० टक्के वैद्यकीय लाभ देण्याच्या सर्वसाधारण सभेच्या निर्णयावर स्वयंसेवी संस्थांनी टीका केली आहे.

पिस्तूल विक्रीप्रकरणी तिघांना अटक

$
0
0
गुन्हे शाखेच्या युनीट दोनने वारजे जुन्या जकात नाक्याजवळ दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहे. या आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून कोर्टाने तिघांना एक दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images