Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कॅन्टोन्मेंट बोर्डात पवारपॉवर!

$
0
0
पुणे आणि खडकी कँन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले असून, दोन्ही बोर्डांच्या निवडणुकांची जबाबदारी आमदारांवर सोपविण्यात आली आहे.

शिवसृष्टी कुलूपबंद

$
0
0
शिवनजन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी ५० लाख रुपये खर्च करून बांधलेली शिवसृष्टी नऊ महिन्यांपासून कुलूपबंद अवस्थेत आहे.

भोर नगर परिषदेची विशेष सभा रद्द

$
0
0
भोर नगरपरिषदेची विशेष सभा एकाही विषयावर चर्चा न होता दीड तासात रद्द करण्याची नामुष्की नगराध्यक्षा दीपाली शेटे यांच्यावर शुक्रवारी आली. नगरसेवकांच्या खास मागणीवरून शेटे यांनी १० विषयांवर विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती.

गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांची मदत हवी

$
0
0
‘वडगाव शेरी परिसरातील वाढती लोकसंख्या पाहता नवीन पोलिस ठाण्याची निर्मिती होणे गरजेचे होते. यामुळे नागरिक सुरक्षितपणे राहू शकतील. चंदननगर भागात वाढणारी गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिस नक्कीच प्रयत्नशील राहतील.

आर्ट ऑफ गिव्हिंग…

$
0
0
अलीकडे नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे द रियल हिरो’ पाहिल्यावर प्रत्येकाच्याच मनात आपणही अशा प्रकारच्या कामाला कुठल्या न कुठल्या स्वरुपात हातभार लावावा अशी भावना जागी झाली आहे.

संकटग्रस्त महिलांसाठी विश्वासार्ह ‘स्नेहाधार’

$
0
0
जन्मदात्या पित्याकडून मुलीचे लैंगिक शोषण, शाळेच्या शिक्षकाकडून चिमुरडीवर अत्याचार, नोकरीच्या आमिषाने युवतीची फसवणूक, पोटच्या पोरीची आईकडून विक्री, विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळवून तिच्यावर सामूहिक बलात्कार, वसतिगृहाच्या अधीक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण अशाप्रकारच्या बातम्या वरचेवर कानावर येत असतात.

‘मनसे’ची मनापासून तयारी

$
0
0
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पराभव स्विकारावा लागल्यानंतर, धक्क्यातून अजून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते बाहेरही पडले नाहीत. तोच त्यांना खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांना सामोरे जावे लागत आहे.

गैरवर्तन करणाऱ्या लिपिकाला बेदम चोप

$
0
0
विद्यार्थीनीशी गैरवर्तन करणाऱ्या ज्ञानदीप विद्यालयातील लिपिकाला दामिनी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) चोप दिला. शाळेच्या आवारातच दुपारी पावणेदोनच्या सुमारास हा प्रकार घडला.

मोलकरणीने केली सहा लाखांची चोरी

$
0
0
घरकाम करण्यासाठी दोनच दिवस आलेल्या महिलेने घरातून सहा लाख तीन हजार रुपयांचा ऐवज चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वानवडी येथील सोपान बागेत हा प्रकार घडला असून, या प्रकरणी जयदीप खुराणा (वय ४०, रा. सोपानबाग) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

होय, पोलिस अधिकारी चुकतात

$
0
0
वेळ सकाळी दहाची...बोपोडी चौक...नेहमीप्रमाणे चौकात गर्दी...कामावर जाणाऱ्या कामगारांची लगबग...तेवढ्यात वाहतूक शाखेची गाडी चौकात येते...अधिकारी गाडीतून उतरतात...त्यांच्या बरोबर गाडीतले पोलिसही उतरतात आणि सुरू होतो हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा.

उद्या ‘सायकल राइड’चे आयोजन

$
0
0
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या ‘टाइम्स : आय प्लेज आय चेंज’ या मोहिमेअंतर्गत रविवारी (२३ नोव्हेंबर) ‘सायकल राइड’ आयोजित करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील (आरटीओ) संगम पूल येथे सकाळी ५.३० वाजता राइडला प्रारंभ होणार आहे.

‘मटा लँड एक्स्पो’ आजपासून सुरू

$
0
0
शहर आणि परिसरामधील जागांचा वेध घेणारे ‘मटा लँड एक्स्पो २०१४’ हे दोन दिवसांचे प्रदर्शन आज, शनिवारपासून सुरू होत आहे. गणेश कला-क्रीडा मंच येथे सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसात या कालावधीत दोन्ही दिवस ते खुले राहील.

भार्गवी आता नव्या ‘भूमिके’त

$
0
0
‘वहिनीसाहेब’, ‘असंभव’सारख्या मालिका, ‘एकापेक्षा एक’सारखा रिअॅलिटी शो आणि ‘धागेदोरे’, ‘इश्कवाला लव्ह’ यांसारख्या निरनिराळ्या विषयांवरील सिनेमांतील भूमिकांपर्यंत अभिनयाचा मोठा पल्ला गाठणारी अभिनेत्री भार्गवी चिरमुले आता एका ‘म्युझिक शो’मधून पुणेकरांना भेटणार आहे.

करिअर पॅनोरमा आजपासून

$
0
0
‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’च्या ‘अॅकॅडमी फॉर करिअर एक्सलन्स’च्या (एमईएस-एसीई) वतीने दहावीनंतर विज्ञान शाखेतील उपलब्ध कालसुसंगत करिअरची माहिती देण्यासाठी ‘करिअर पॅनोरमा २०१५’चे आयोजन करण्यात आले आहे.

‘तोड फोड जोड’ केंद्र मार्चमध्ये पुण्यात

$
0
0
‘तोड, फोड... जोड’ हे शब्द आता मुलांमधील कल्पकता जागवणार आहेत. एखादी गोष्ट पुन्हा नव्याने करून पाहण्याच्या कुतुहलाला चालना देणारे ‘तोड, फोड, जोड’ केंद्र मार्च २०१५ मध्ये पुण्यात सुरू होत आहे. ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन कौन्सिल’ने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

NDA तील धावपट्टीचे लवकरच विस्तारीकरण

$
0
0
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) विमानतळाच्या धावपट्टीचे लवकरच विस्तारीकरण करण्यात येणार आहे. सध्या ९०० मीटर लांब आणि १५ मीटर रुंद असलेली ही धावपट्टी लवकरच १५०० मीटर लांब आणि ३० मीटर रुंद होणार आहे. येत्या दोन वर्षांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

रुपी बँकेच्या पुनरुज्जीवनाची मागणी

$
0
0
ठेवीदारांच्या एका पैशालाही धक्का लागू नये यासाठी रुपी बँकेचे अन्य बँकेत विलीनीकरण न करता पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी पुणेकर नागरिक कृती समितीने राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे शुक्रवारी केली.

मराठी भाषेची सक्ती नको

$
0
0
‘मुंबई वगळता राज्यात इतरत्र मराठी भाषेची स्थिती चांगली आहे. मुंबईतील मराठी शाळांचा टक्का घसरण्यामागील कारणे आर्थिक आणि जागतिक आहेत. ती सांस्कृतिक आणि भाषक नाही. त्यामुळे शिक्षणात मराठी भाषेची सक्ती नको,’ असे स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी मांडले.

शहराच्या स्वच्छतेसाठी कर्मचारीच अपुरे

$
0
0
गेल्या १० वर्षांत शहराचा वाढलेला पसारा आणि दैनंदिन स्वच्छतेसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या यामुळेच शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठत असल्याची कबुली पालिकेने शुक्रवारी दिली.

विद्यापीठाच्या आवारात मुलांनी उपसल्या तलवारी

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात शुक्रवारी सायंकाळी तलवारीच्या साह्याने मारामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, सायंकाळच्या वेळेत तलवारीसह हॉकी स्टिक, काठ्यांनी हाणामारी झाल्याने विद्यापीठातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images