Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पालिकेच्या शाळेत स्वच्छतागृहे अपुरी, अस्वच्छ

$
0
0
महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलामुलींसाठी पुरेशा प्रमाणात स्वतंत्र स्वच्छतागृहे नसून, उपलब्ध स्वच्छतागृहांची अ‍वस्था दयनीय असल्याचे गाऱ्हाणे मुलांसह पालकांनी मांडले. शाळांत मुलांना शिक्षकांकडून मारहाण होत असल्याने शारीरिक शिक्षेवर बंदी घालण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

चौथीच्या मुलांना वजाबाकी येईना

$
0
0
दुसऱ्या इयत्तेत शिकवले जाणारे वजाबाकीचे गणित तिसरी, चौथीच्या ६९ टक्के विद्यार्थ्यांना सोडवता येत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यातून महापालिकेच्या शाळांमधील मुलांच्या गणिताच्या प्रगतीविषयीचा आलेख स्पष्ट झाला आहे.

‘डीपी’संबंधी अहवालासाठी मुदतवाढीची मागणी

$
0
0
पालिकेच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावरील (डीपी) नागरिकांनी घेतलेल्या हरकती आणि सूचनांची सुनावणी पूर्ण झाली आहे. सुनावणी घेणाऱ्या नियोजन समित‌ीला आपला अहवाल नियोजन प्राधिकरणाकडे सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

एरंड्याच्या बिया खाल्याने बारा मुलांना विषबाधा

$
0
0
शेंगदाणे समजून एरंड्याच्या बिया खाल्यामुळे बारा मुलांना विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी चारच्या सुमारास देहू येथे घडला. सर्वांना पिंपरीतील ‘वायसीएम’ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.

दहा टक्के सफाई कर्मचाऱ्यांत फुफ्फुसाची क्षमता कमीच

$
0
0
पुणेकरांच्या आरोग्यासाठी स्वतःचे आरोग्य धुळीत टाकून रस्त्यांची साफसफाई करणाऱ्या विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांतील दहा टक्के अर्थात सुमारे ५० कर्मचाऱ्यांच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता खालावल्याचे दिसून आले आहे.

महापालिकेच्या तिजोरीत एलबीटीमुळे १०२ कोटींची भर

$
0
0
रहदारी शुल्क (एस्कॉर्ट) रद्द, तर बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे मुद्रांक शुल्कावरील अधिभारातून मिळणाऱ्या उत्पन्नात घट होऊनही स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) माध्यमातून पालिकेला ‘शंभर कोटी’ रुपयांचा टप्पा गाठण्यात यश आले आहे.

तावडे-पवारांच्या चर्चेत ‘मिनी ऑलिंपिक’

$
0
0
राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गुरुवारी पुण्यात झालेल्या बैठकीत क्रीडा क्षेत्राशी निगडित दहा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

‘पीएमपी’ची संभाव्य दरवाढ टळली

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सादर केलेला भाडेवाढीचा प्रस्ताव जिल्हा परिवहन प्राधिकरणाने (डीटीए) परत पाठविला आहे. त्यामुळे प्रवाशांवर पडणारा संभाव्य दरवाढीचा बोजा तूर्त लांबणीवर पडला आहे.

बैठकीला अधिकारीच नाहीत

$
0
0
पीएमपीचा तोटा कमी करण्यासाठी ७० कोटी रुपयांची मदत करण्यास स्थायी समितीने मान्यता देताच, पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेसमोर हा विषय चर्चेला येण्याची शक्यता असतानाही, पीएमपीची एकही अधिकारी या बैठकीला उपस्थित राहिला नाही.

मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी दादागिरी

$
0
0
पालिकेतील महत्त्वाच्या खात्यामध्ये मर्जीतील अधिकाऱ्यांची बदली करण्यात महापालिका आयुक्त नकार देत असल्याने पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी जोरदार त्रागा केला.

‘एलबीटी’विरोधात व्यापाऱ्यांचे आंदोलन

$
0
0
व्यापाऱ्यांना जाचक ठरत असलेला एलबीटी भाजप सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत रद्द करण्याचे जाहीर आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी एलबीटीबाबत ‘यू टर्न’ घेतला.

विद्यापीठ परीक्षांसाठी स्वतंत्र बोर्ड स्थापणार

$
0
0
राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये सातत्याने निर्माण होणाऱ्या अडचणी पाहता, बोर्डाच्या धर्तीवर विद्यापीठाच्या परीक्षांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याचा मुद्दा राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.

नायजेरियन तरुणाकडून अमली पदार्थ जप्त

$
0
0
अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा परिसरात एका नायजेरियन तरुणाकडून ‘मॅथ्याक्युलॉन’ नावाचा अमली पदार्थ जप्त केला आहे. या ना​गरिकाकडून पाच ग्रॅम ५०० मिली असलेल्या ‘मॅथ्याक्युलॉन’ची किंमत १३ हजार रुपये आहे. हा अमली पदार्थाची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती अमली विरोधी पथकाला मिळाली होती.

लाचखोर पोलिसांसह कृषी कर्मचारी गजाआड

$
0
0
तळेगाव पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांत खोटी तक्रार दिली म्हणून कारवाईची भीती दाखवून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलिस ठाण्यातील दोघा सहायक फौजदारांना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली.

कोरेगाव प्रांताधिकाऱ्यांना अटक

$
0
0
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) बनावट यूएलसी प्रकरणात गेल्या चार दिवसांत सातारा येथील कोरेगावच्या प्रांताधिकाऱ्यासह तिघांना अटक केली. या प्रांताधिकाऱ्याला कोर्टाने २२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ज्या चौकशा करायच्या त्या सरकारने कराव्यात!

$
0
0
‘कोणत्याही प्रकारच्या चौकशा करायच्या आहेत, त्या राज्य सरकारने कराव्यात. सरकारला त्याचे अधिकार आहेत. चौकशीमध्ये जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करावी. जे दोषी नसतील त्यांना क्लिन चीट द्यावी,’ अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी त्यांच्याविषयीच्या आरोपांसंदर्भातील वावड्यांना उत्तर दिले.

भ्रष्टांवर कारवाईचे भाजपचे स्वप्न कायम

$
0
0
भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करण्याचे भाजपचे स्वप्न अद्यापही कायम असल्याची स्पष्टोक्ती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केली.

...म्हणूनच IIM पुण्याबाहेर

$
0
0
विद्येचे माहेरघर म्हणून लौकिक असलेल्या पुण्याकडे पाठ फिरवून ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम) या व्यवस्थापनशास्त्र शिक्षणाच्या प्रतिष्ठित संस्थेसाठी केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकारने अखेर नागपूरलाच पसंती दिल्याचे कळते.

जेव्हा तावडे-दादा एकत्र येतात!

$
0
0
अजित पवार यांना अटक करण्याबाबतच्या भूमिकेविषयी विनोद तावडे यांना पत्रकारांनी विचारलेला प्रश्न... भारतीय जनता पक्षाचे त्या विषयीचे ‘स्वप्न’ कायमच असल्याचे तावडे यांचे उत्तर...तावडे यांचे कुलगुरूंच्या केबिनकडे प्रयाण...

८ वीपर्यंत नापास न करणे चुकीचे

$
0
0
पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. यामुळे मुलांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images