Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

देहविक्रय करणाऱ्या दोन तरुणींची सुटका

$
0
0
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने धनकवडी, सहकारनगर परिसरात देहविक्रय करणाऱ्या पश्चिम बंगालमधील दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे, तर वेश्या व्यवसाय करणाऱ्या एजंटला अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील उच्चशिक्षित जाताहेत नक्षलींच्या जंगलात

$
0
0
पुण्यातील उच्चशिक्षित तरुणांना गडचिरोलीतील जंगलात नक्षली बनवण्याचा ​‘गोल्डन कॉरिडॉर ​कमिटी’चा ‘राजमार्ग’ दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) उघडकीस आणला आहे. पुण्यातील दोघा तरुणांना गडचिरोलीच्या जंगलात पाठवण्यात याच नक्षली नेटवर्कने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे ठोस पुरावे ‘एटीएस’च्या हाती लागले आहेत.

कारभाऱ्यांमधील विसंवादाचा पुणेकरांना बसणार फटका

$
0
0
कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शहराच्या आजुबाजूला असलेल्या मोकळ्या खाणींमध्ये कचरा डंपिंग करण्याची परवानगी द्यावी, असा कोणताही प्रस्ताव अद्याप आपल्याकडे आला नसल्याचे केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी स्पष्ट केले.

सीमेवरील अशांततेत संयुक्त लष्करी सराव

$
0
0
एकीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनचे सैनिक पाकिस्तानी सैनिकांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देत असल्याचा अहवाल आला असतानाच, दुसरीकडे पुण्यात भारत आणि चीन या दोन्ही लष्करांच्या चौथ्या संयुक्त सरावाला प्रारंभ झाला.

तिकीटवाटपाच्या तहात जिंकणार?

$
0
0
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘युद्धात जिंकणार; पण तहात हरणार’. विधानसभा निवडणुकीत या पक्षाची हीच गत झाली. भाजपबरोबरच्या मैत्रीनंतर विधानसभा निवडणुकीत पारंपरिक मतदार असूनही पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघ ‘आरपीआय’ला मिळाला नाही.

मेसेज FWD करणे पडले महागात

$
0
0
‘व्हॉट्स अॅप’वरील मेसेज फॉरवर्ड केल्याने थेट पोलिस चौकीत हजर होण्याची वेळ येरवड्यातील एका तरुणावर आली. त्यामुळे सध्याच्या राजकीय संवेदनशील परिस्थितीमध्ये नेतेमंडळींची बदनामी करणारे मेसेज शेअर केल्याचे काय परिणाम होऊ शकतात, याचा धडाही नेटिझन्सना मिळाला आहे.

परतावा नाकारणाऱ्यांना दणका

$
0
0
विद्यार्थ्याने इंजिनीअरिंगचा प्रवेश रद्द केल्यानंतरही त्याला फी परतावा नाकारणाऱ्या ‘एआयएसएसएमएस’च्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीला ग्राहक मंचाने दणका दिला आहे.

महापालिकेचा ‘राजा’ PMP वर उदार

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कर्मचाऱ्यांचे वेतन आणि संचलनातील तूट भरून काढण्यासाठी पालिकेतर्फे आणखी ७० कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे.

‘IIM’बाबत ‘नरो वा कुंजरो वा’

$
0
0
‘आयआयएम’सारखी मानाची संस्था पुण्यात येण्यासाठी शिक्षणविश्वातून दबाव टाकण्यात येत असला, तरी पुण्यातील नेत्यांकडून या प्रस्तावाला बळ मिळताना दिसत नाही. ‘पुणे हे विद्येचे माहेरघर नक्कीच आहे; पण नागपूर, औरंगाबाद ही महाराष्ट्रातील शिक्षणाची महत्त्वाची केंद्र आहेत.

पावसामुळे कुठे हसू, कुठे आसू

$
0
0
गेल्या आठवड्यात बारामती तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे काही भागांत शेतीचे नुकसान झाले आहे, तर काही भागांत पिकांना फायदा झाला आहे. बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

बहुमत सिद्ध करण्याची ही पद्धत नाहीःराज

$
0
0
‘भाजप सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी कोणाचे काय चालले आहे; कोण सत्ताधारी, कोण विरोधी हेच समजत नव्हते. राज्याच्या इतिहासात अशी परिस्थिती प्रथमच उद्‍‍भवली असून, बहुमत सिद्ध करण्याची ही पद्धत नाही,’ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी राज्य सरकारवर हल्ला चढविला.

खराडीत होतेय इनडोअर स्टेडियम

$
0
0
बालेवाडी क्रीडा संकुलाच्या धर्तीवर पूर्व भागातील खेळाडूंकरिता खराडी भागात अडीच एकर जागेवर पंधरा कोटी रुपये खर्च करून अद्ययावत आच्छादित क्रीडा संकुल (इनडोअर स्टेडिअम) उभारण्याचे काम प्रगतिपथावर असून, ते डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

अनधिकृत हातगाड्यांमुळे नागरिकांना त्रास

$
0
0
पाषाण सूसरोड येथील अभिनव कला महाविद्यालयालगत असलेल्या अनधिकृत हातगाड्यांमुळे पादचारी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, रस्त्याकडेला बसणाऱ्या तळीरामांमुळे संध्याकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या महिलांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

सारोळा पूल ‘जैसे थे’च

$
0
0
पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा पुलाची स्थिती अद्यापही धोकादायकच आहे. बरोबर एक वर्षापूर्वी या दोन पुलांमधील मोकळ्या जागेतून मोटार थेट नदीत पडल्यामुळे पुण्यातील एका जाहिरात कंपनीतील चौघांचा मृत्यू झाला होता.

पुढच्या महिन्यात लावणी महोत्सव

$
0
0
महाराष्ट्राची पारंपरिक कला असलेल्या लावणीला प्रोत्साहन मिळावे आणि गतवैभव प्राप्त व्हावे, या उद्देशाने शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने ‘पुणे लावणी महोत्सव’ आयोजित केला आहे.

‘ज्ञानभाषा मराठी’साठी १९ कोशांचा प्रस्ताव

$
0
0
मराठीला ज्ञानभाषा करण्याच्या उद्देशाने विविध शास्त्रांची परिभाषा मराठीत आणण्यासाठी एकोणीस नवीन कोश निर्माण करण्याचा ठराव मराठी भाषा सल्लागार समितीने केला आहे. या बाबतचा प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारला सादर केला जाणार आहे.

जोहान्सबर्गच्या विश्व संमेलनाचे काय?

$
0
0
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होऊ घातलेले विश्व साहित्य संमेलन लाल फितीच्या कारभारात अडकले आहे. संमेलनबाबतच्या तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवलेल्या प्रस्तावाकडे सरकार बदलल्यामुळे अद्याप दुर्लक्षच झाले असून, विश्व संमेलनाचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रकाशकांची नाराजी दूर?

$
0
0
घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या घोषणेनंतर प्रकाशकांनी व्यक्त केलेली नाराजी आता दूर होत आहे. प्रकाशकांकडूनच संमेलनाबाबत विचारणा होऊ लागल्याची माहिती महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिली.

ग्रंथदिंड्या जाणार घुमानला

$
0
0
संत नामदेव यांची कर्मभूमी असलेले पंजाबमधील घुमान ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्यप्रेमी आणि नामदेवभक्तांच्या उपस्थितीने गजबजणार आहे. राज्याच्या विविध भागांतून ग्रंथदिंड्या संमेलनस्थळी जाणार आहेत.

माध्यमांनी मर्यादेचे पालन करणे गरजेचे

$
0
0
‘सार्वजनिक जीवनातील कोणतीही घटना, प्रसंग अथवा सरकारने दिलेल्या आकड्यांचा ‘एक्स-रे’ काढून त्यातील सत्य उजेडात आणण्याची क्षमता माध्यमांमध्ये आहे; पण पारदर्शकतेच्या नावाखाली सत्यशोधन करताना माध्यमे सनसनाटीपणाकडे अधिक झुकत आहेत’, असे निरीक्षण ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी नुकतेच व्यक्त केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images