Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुणे ‘जिप’च्या भेटीला गुजरात शिष्टमंडळ

$
0
0
जिल्हा परिषद स्तरावरच विविध विकासयोजनांचा शुभारंभ केलेल्या आणि त्यांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करून राज्यभरात नाव कमावलेल्या पुणे जिल्हा परिषदेला गुजरातच्या राज्य ग्रामीण विकास संस्थेचे शिष्टमंडळ भेट देणार आहे.

पंचायत अभियंता पुन्हा भरती होणार?

$
0
0
जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या पंचायत अभियंता भरतीला कमी प्रतिसाद मिळाल्याने परिषदेवर पुन्हा भरती प्रक्रिया राबविण्याची वेळ आली आहे. अभियंत्यांच्या १९३ जागा भरावयाच्या असताना आता फक्त ७२ जण प्रत्यक्ष कामावर हजर आहेत.

पुस्तक दान आवाहनला भरभरून प्रतिसाद

$
0
0
चिंचोली मोराची (ता. शिरूर) येथील संस्कृती ग्रंथालय आणि वाचनालयाला पुस्तकाचे दान करा, या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला. सुमारे दीड हजार पुस्तके ग्रंथालयाला भेट मिळाली, अशी माहिती आरोग्य सेनेचे पिंपरी-चिंचवडचे सरचिटणीस गणेश थोपटे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली

$
0
0
गेली दहा वर्षे आघाडी करून लढल्याने एकमेकांच्या ताकदीचा अंदाज कोणाला नव्हता. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटली आणि महाराष्ट्रात दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले.

आयुक्तांपुढे महिलांनी वाचला समस्यांचा पाढा

$
0
0
प्रभाग पाहणी दौरा करणाऱ्या महापालिका आयुक्तांना महिलांच्या तक्रारीला सामोरे जावे लागले. पुरेसे पाणी येत नसल्याच्या तक्रारी करत अन्य प्रभागातील अन्य समस्यांचाही पाढा महिलांनी आयुक्तांसमोर वाचला.

आरपीआय-भाजप रंगले वाक्‍युद्ध

$
0
0
भाजप-आरपीआय महायुतीचे पिंपरी विधानसभा मतदार संघातील आपरीआयच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे यांच्या पराभवाला खासदार रामदास आठवले यांना जबाबदार धरू नये असे आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत यांच्या पत्रावर दशरथ ठाणांबीर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

पुणेकरांमधील ९५ टक्के ‘सीओपीडी’चे निदान नाही

$
0
0
‘स्पायरोमेटरी’चाचणीचा डॉक्टरांसह पेशंटकडून होणाऱ्या अपुऱ्या वापरामुळे आजाराचे निदान न झाल्याने पुण्यातील ९५ टक्के पेशंटमधील ‘सीओपीडी’ या फुफ्फुसाशी संबंधित आजाराचे निदानच होत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

विद्यार्थी, पालकांनीच घ्यावी दक्षता

$
0
0
विद्यार्थ्यांना फी परतावा देण्यात कॉलेजांकडून होणारी टाळाटाळ रोखण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनीच अधिक सजगतेने नियमांची-अटींची माहिती घेणे गरजेचे असल्याचे मत या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

टू-व्हीलर पर्किंगसाठी कॉलेज घेणार ३ रुपये

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कॉलेजांमध्ये यापुढे टू-व्हीलरच्या पार्किंगसाठी दिवसाला तीन रुपये शुल्क आकारण्याला विद्यापीठाने मान्यता दिली आहे.

IT विभागाच्या पेन्शनर्ससाठीही सुविधा

$
0
0
राज्यातील नागरिकांसाठी ‘डिजिटल लॉकर’ची सुविधा पुरविणाऱ्या राज्याच्या आयटी विभागाने आता पेन्शनर्ससाठीही आपल्या सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.

जंगलतोड, प्रदूषण मान्सूनच्या मुळावर

$
0
0
मान्सूनच्या प्रमाणात होणाऱ्या बदलामागे कार्बन उत्सर्जनासारख्या जागतिक कारणांपेक्षा प्रदूषण, जंगलाचे घटते क्षेत्र आदी स्थानिक कारणे अधिक प्रभावी असल्याच अनुमान पुण्यातील ‘सेंटर फॉर क्लायमेट चेंज रिसर्च’ (सीसीसीआर) या संस्थेने काढला आहे.

जेरुसलेममध्ये पुणेकर पर्यटक सुखरूप

$
0
0
इस्रायलमधील जेरुसलेमजवळच्या सिनेगॉग‌वर अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. मात्र, तिकडे गेलेले पुण्यातील चाळीस पर्यटक सुखरूप आहेत. स्थानिक पर्यटन विभागाने त्यांना चोख सुरक्षा पुरविली असून, त्यांचा नियोजित प्रवासही पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

औद्योगिक क्षेत्रासाठी ‘IIM’ पोषक

$
0
0
राज्यातील एकमेव ‘आयआयएम’ पुण्यात स्थापन झाल्यास, पुण्याभोवतालच्या औद्योगिक क्षेत्राला त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे मत औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

‘बहुमत सिद्ध करण्याची ही पद्धत नाही’

$
0
0
‘भाजप सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी कोणाचे काय चालले आहे; कोण सत्ताधारी, कोण विरोधी हेच समजत नव्हते. राज्याच्या इतिहासात अशी परिस्थिती प्रथमच उद्भवली असून, बहुमत सिद्ध करण्याची ही पद्धत नाही,’ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी राज्य सरकारवर हल्ला चढविला.

मारणे टोळीचे ६ आरोपी गजाआड

$
0
0
नीलेश घायवळ टोळीचा प्रमुख साथीदार असलेल्या संतोष उर्फ पप्पू हिरामण गावडे याच्या खूनप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी पप्पू कुडले, प्रदीप कंधारेसह पाच आरोपींना खेड-शिवापूर परिसरातून अटक केली, तर गुन्हे शाखेने पवळे चौकातून एका आरोपीला ताब्यात घेतले.

कोअर कमिटीचे १४ सदस्य पुण्या-मुंबईत ‘कार्यरत’

$
0
0
पुणे, मुंबई, सुरत आणि अहमदाबाद या ‘गोल्डन कॉरिडॉर’मध्ये कोअर कमिटीच्या १४ सदस्य तरुणांना फितवून जंगलात नेण्यासाठी कार्यरत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात उघड झाली आहे.

‘कम्प्लिशन’साठी आता नियमित दराने शुल्क

$
0
0
पालिकेकडून भोगवटा पत्र (कम्प्लिशन सर्टिफिकेट) न घेतलेल्या सदनिकाधारकांना भरावा लागणारा अतिरिक्त कराचा दंड स्थायी समितीने माफ केला आहे. त्यामुळे ‘कम्प्लिशन’साठी अर्ज करणाऱ्या नागरिकांकडून आता नियमित दराने शुल्क आकारणी केली जाणार आहे.

‘मालमत्ता’ सादर करा, ३१ डिसेंबरपूर्वी

$
0
0
राज्य सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार महापालिका आणि निमशासकीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांना गेल्या आर्थिक वर्षातील (२०१३-१४) मालमत्तेचे विवरण सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरची डेडलाइन देण्यात आली आहे.

ना. गोखलेंचा सरकारला विसर?

$
0
0
पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल अशा राष्ट्रपुरुषांची जयंती साजरी करण्याच्या मुद्द्यावरून आणि त्यांचा वारसा चालविण्यावरून देशभरात धामधूम उडाली आहे.

किडनी औषधाची रस्त्यावर विक्री

$
0
0
किरकोळ औषध विक्रेत्यांच्या नावावर खोटी बिले तयार करून त्याद्वारे किडनीच्या औषधाची विक्री रस्त्यावर खुलेआम करण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला. पेरुगेट पोलिस चौकीजवळ ग्राहक बनून गेलेल्या केमिस्टनेच सापळा रचून सदाशिव पेठेतील एका घाऊक विक्रेत्याच्या प्रतिनिधीला रंगेहाथ पकडले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images