Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सत्ता टिकविण्यासाठी धडपड

0
0
लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर पुण्याची सत्ता गमवावी लागलेल्या काँग्रेसची कॅटोन्मेंट निवडणुकीमध्ये सत्ता टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे. दोन्ही चुका या निवडणुकीत होऊ नयेत. उमेदवाराने गाफील राहून नये, तसेच सुरुवातीपासूनच कामाला लागण्याचे धोरण स्विकारण्यात आले आहे.

ट्रकखाली सापडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

0
0
रामटेकडीजवळच्या वंदे मातरम् चौक येथे एका ज्येष्ठ नागरिकाचा रविवारी ट्रकखाली सापडून मृत्यू झाला. ट्रकचा ड्रायव्हरस फरार झाला आहे. अब्दुल अझीज डंकीवाले (७०, रा. वंदे मातरम् चौक) असे त्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून, ते रस्त्यावरून कुबड्या घेऊन चालत होते.

पुण्यात सहाशे टन कचऱ्याचे संकलन

0
0
‘पर्यावरणाचा ध्यास आणि परिवर्तनाची आस’ या ध्येयाने कार्यरत असलेल्या डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने जगातील सर्वांत मोठ्या स्वच्छता अभियानाची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या देशव्यापी स्वच्छता मोहिमेअंतर्गत पुण्यात तीनशे किलोमीटरच्या रस्त्यांची दुतर्फा साफसफाई करण्यात आली.

वहिवाटीचा रस्ता अडवला

0
0
बाणेर येथील अनेक वर्षांचा वहिवाटीचा रस्ता बांधकाम व्यवसायिक व जागा मालकाने अडवल्याने या परिसरातील सुमारे शंभरहून अधिक कुटुंबांची मोठी गैरसोय झाली आहे. जुना वापरात असणारा वहिवाटीचा रस्ता बंद करून या परिसरातील नागरिकांचा जाण्या-येण्याचा रस्ता बंद केला आहे.

कार्तिकी यात्रेसाठी ‘पीएमपी’च्या जादा बस

0
0
कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदी येथे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) जादा बस सोडण्यात येणार आहेत. आज, मंगळवारपासून गुरुवारपर्यंत (२० नोव्हेंबर) गरजेनुसार रात्रीही बससेवेची सुविधा उपलब्ध असेल.

कार्तिकी यात्रेसाठी प्रशासन सज्ज

0
0
कार्तिकी यात्रेनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या दर्शनासाठी आळंदीत दाखल झालेल्या व दाखल होत असलेले लाखो वारकरी व भाविकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाकडून सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले असून, सुरक्षेबाबत कोणतीही कसर ठेवण्यात आलेली नाही.

वेल्हे पंचायत समितीला टाळे

0
0
वेल्हे तालुका पंचायत समितीमधील कर्मचारी कधीही वेळेत कामावर येत नाहीत. त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून शनिवारी पंचायत समिती सदस्य राजेश निवंगुणे व कामासाठी आलेल्या नागरिकांनीच कार्यालयाला चक्क टाळे ठोकून आपला राग व्यक्त केला.

सीएनजीच्या स्फोटात चिमुरडा जखमी

0
0
नाना पेठ येथे रिक्षा स्क्रॅप करताना ‘सीएनजी’ टाकीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तिघांसह तीन वर्षांचा मुलगा ८० टक्के भाजला आहे. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी स्क्रॅप व्यावसायिकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

NCP मध्ये लवकरच मोठे फेरबदल

0
0
निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर केवळ पुण्यातच नव्हे तर राष्ट्रवादीच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल केले जातील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले.

बिबट्याच्या हल्ल्यात कोळवाडीत महिला ठार

0
0
आपल्या बहिणीच्या गावी चाललेल्या महीलेवर बिबट्याने हल्ला केला.त्यात महीलेचा मृत्यू झाला.ही घटना काल सायंकाळी आठच्या सुमारास घडली. सखुबाई दादाभाऊ वारे (३५) रा. पेमदरा, ओतूर असे या मृत महिलेचे नाव आहे.

बनावट इन्शुरन्स पॉलिसी तयार करणारे दोघे गजाआड

0
0
बनावट इन्शुरन्स पॉलिसी तयार करून ती १२०० रुपयांना विकणाऱ्या येरवड्याच्या दोघांना गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली. या आरोपीने शहरातील दीडशे वाहन चालकांना या पॉलिसी विकल्या आहेत.

दररोज होते ८ वाहनांची चोरी

0
0
शहराच्या वाढत्या पसाऱ्यामुळे दररोज आठ वाहने चोरी जातात तर दर दिवसाला एक चेन स्नॅचिंग होते. गेल्या वर्षात वाहन चोरीचे सुमारे अडीच हजार गुन्हे दाखल असून त्यातील केवळ चारशे केसेस सोडविण्यात पोलिसांना यश आले आहे.

दलित अत्याचारांविरोधात कृती समिती

0
0
नगर जिल्ह्यातील जवखेडे खालसा येथे झालेले तिहेरी दलित हत्याकांड आणि गेल्या काही काळातील अशा सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी, सरकारला जागे करून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी चळवळ व डाव्या संघटना २८ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत.

‘रायसोनी’च्या ठेवीदारांचा जळगावला ‘एल्गार मेळावा’

0
0
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेने ठेवींच्या बदल्यात वीस टक्के रक्कम परत देण्यासाठी टोकन पद्धत सुरू केली आहे.

कँटोन्मेंट निवडणुकीसाठी राज्य सरकारी कर्मचारी

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीच्या कामकाजासाठी बोर्डातील कर्मचाऱ्यांऐवजी राज्य सरकारच्या कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या जाणार आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे होण्यासाठी बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

पराभवाच्या जखमेवर फुंकर

0
0
विधानसभा निवडणुकीतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येत आहेत. चार दिवसांच्या या दौऱ्यात ठाकरे प्रत्येक वॉर्डच्या गटाध्यक्षासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून पराभवाची कारणे जाणून घेणार आहेत.

चित्रपटसृष्टीच्या मागण्यांचा सांस्कृतिक मंत्र्यांकडे लकडा

0
0
राज्यात पंधरा वर्षे सत्तेवर असताना सांस्कृतिक समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेश सांस्कृतिक विभागाने नव्या सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडे मागण्यांचा लकडा लावत ‘सांस्कृतिक’ स्वागत केले.

शालेय ग्रंथालयांचा कारभार कम्प्युटरविनाच

0
0
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात ग्रंथालयांचा प्रवास ई-लायब्ररीच्या दिशेने होत असताना शालेय ग्रंथालयांचा कारभार कम्प्युटरविनाच सुरू आहे. त्यामुळे राज्यभरातील शाळांची ग्रंथालये कम्प्युटरने कधी सुसज्ज होणार, असा प्रश्न ग्रंथपालांकडून उपस्थित केला जात आहे.

महापालिका करणार डेंगीबाबत जनजागृती

0
0
दोन दिवसांच्या पावसाने डेंगीचा विळखा वाढण्यास आणखीच मदत होण्याच्या शक्यतेने महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी डेंगीबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येत्या शनिवारी (दि. २२) डेंगी जनजागृती दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘रुपी’-‘लोकसेवा’वरील निर्बंधांना मुदतवाढ

0
0
आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी बँक आणि लोकसेवा सहकारी बँक या बँकांवर घालण्यात आलेल्या निर्बंधांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने सोमवारी दिलेल्या या आदेशामुळे विशेषतः रुपी बँकेचे पुनरुज्जीवन किंवा विलीनीकरणासाठी अवधी मिळणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images