Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आदिवासी जिल्ह्यातील जमिनींची प्रकरणे रखडली

$
0
0
जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता खरेदी व्यवहार झालेल्या आदिवासी समाजाच्या जमिनी परत करण्याच्या कामाला गती देण्यात आली असली, तरी पुणे जिल्ह्यातील ३११ हेक्टर जमिनीची प्रकरणे निर्णयाअभावी रखडली आहेत.

वैयक्तिक शौचालयांसाठी अनुदान

$
0
0
ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामासाठी आता १२ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेच्या प्रारंभापासून लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

हेल्मेट सक्तीला संस्था-संघटनांचा विरोध

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या अघोषित हेल्मेट सक्तीला संस्था संघटनांनी विरोध केला आहे. हेल्मेटसक्ती विरोधात ‘मराठा युवा फाउंडेशन’तर्फे पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांना निवेदन देण्यात आले.

जनतेसाठी काम करणारे पोलिसच खरे हिरो

$
0
0
समाजात महिलांवर सातत्याने वाढणारे अत्याचार अतिशय गंभीर बाब आहे. ते रोखण्यासाठी महिलांना सक्षम आणि निर्भय बनविणे आवश्यक आहे. ‘मर्दानी’ चित्रपटात काम करताना साकारलेली पोलिस अधिकाऱ्याची भूमिका आपल्या जीवनात महत्त्वाची होती.

‘आदित्य’ शोधणार हवामानबदलाचे कारण

$
0
0
जागतिक हवामान बदलांमध्ये सूर्यावरील बदलत्या स्थितीची नेमकी काय आणि कितपत भूमिका आहे, या कळीच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न भारताचे ‘आदित्य’ हे यान करणार आहे.

‘एल. डी. भावें’च्या ग्राहकांची गैरसोय नाही

$
0
0
शहरातील ‘एल. डी. भावे अँड सन्स’च्या सहा शाखा बंद झाल्याने तेथील गॅस ग्राहकांसाठी केलेल्या पर्यायी व्यवस्थेची माहिती एसएमएसद्वारे कळविण्यात येत आहे, अशी माहिती भारत गॅसच्यावतीने मंगळवारी देण्यात आली.

लोहमार्ग रेल्वे पोलिसातील दोन लाचखाऊंना अटक

$
0
0
लोहमार्ग पोलिसांतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला पेन्शनसाठी अडवणाऱ्या अधीक्षक कार्यालयातील दोघा लिपिकांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक झाली. लोहमार्ग अधीक्षक कार्यालयातील कॅन्टीनमध्येच मंगळवारी दुपारी सापळा लावला होता.

शिरोळे घेणार वडगाव शिंदे गाव दत्तक

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना केलेल्या आवाहनानुसार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील एनकुरे हे गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे, तर पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी वडगावशेरी परिसरातील वडगाव शिंदे हे गाव दत्तक घेण्याचे ठरविले आहे.

बापटांचा लाल दिवा आता निश्चित?

$
0
0
विधानसभा अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून दूर झाल्याने पुण्याचे ज्येष्ठ आमदार गिरीश बापट यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. बापट यांच्या रुपाने पुण्याला आणखी एक लालदिवा येण्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘त्या’ प्राध्यापकामुळे मुलाखती लांबणीवर?

$
0
0
आरोप ठेवण्यात आलेल्या आणि नंतरच्या काळात राजीनामे देणाऱ्या प्राध्यापकांनाही केवळ मुलाखत प्रक्रियेतील तांत्रिकतेमुळे नव्या मुलाखतींसाठी ‘कॉल’ देण्याची नामुष्की शैक्षणिक संस्थांवर ओढावत आहे.

शाळांमधील सुधारणांसाठी पालिकेचा ‘सीएसआर’ फंडा

$
0
0
पालिकेच्या शाळांमध्ये नेमक्या कोणत्या कमतरता आहेत, याची सविस्तर माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून लोकसहभागातून त्या दूर करण्यासाठी ‘कलेक्टिव्ह सोशल रिस्पॉन्सिलिबिलिटी’ (सीएआर) या नव्या उपक्रमाला बुधवारपासून (१२ नोव्हेंबर) सुरुवात केली जाणार आहे.

बँकांचे कामकाज आज विस्कळित होणार

$
0
0
वेतनवाढीसंदर्भातील बोलणी फिस्कटल्याने देशभरातील बँक कर्मचारी आज (बुधवारी) संपावर जाणार आहेत. देशभरातील सुमारे दहा लाख कर्मचारी संपावर जाणार असल्याने बँकांचे कामकाज पूर्णतः विस्कळित होणार आहे.

मैलापाणी प्रक्रियेसाठी हजार कोटी

$
0
0
मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेले प्रकल्प उभारण्यासाठी एक हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा प्राथमिक अहवाल ‘जायका’ या जपानच्या कंपनीने पालिकेला दिला आहे.

शहराला भेडसावणाऱ्या समस्यांवर मराठा चेंबरचे सादरीकरण

$
0
0
पुणे शहराच्या विविध समस्या आणि त्यांवरील संभाव्य उपाययोजना यांबाबत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरतर्फे या महिन्याच्या अखेरीस राज्य सरकारपुढे सादरीकरण करण्यात येणार आहे.

काँग्रेसमधील धुसफूस कायम

$
0
0
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही काँग्रेसमधील धुसफूस अजून शांत झालेली नाही. सदस्यनोंदणीसंदर्भात काँग्रेस भवनात बोलाविण्यात आलेल्या बैठकीकडे शहरातील अनेक उमेदवारांनी पाठ फिरविली.

ATM निर्बंधाविरोधात मनसेची निदर्शने

$
0
0
एटीएम व्यवहारांवर निर्बंध आणण्याच्या बँकांच्या निर्णयाविरोधात मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. ‘एटीएम आमच्या हक्काचे’,‘एटीएम पैसे कमविण्याचे नव्हे तर पैसे काढण्याचे साधन आहे,’,‘मोफत एटीएमचे आश्वासन विसरलात का’ अशा घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले.

माजी नगरसेवकांसाठी ‘फुकट ते आरोग्यदायी’

$
0
0
महापालिकेच्या अनेक माजी नगरसेवकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना पालिकेतर्फे १०० टक्के वैद्यकीय साह्य देण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला.

नव्या पुण्यासाठी नवी महापालिकाच हवी

$
0
0
‘पुणे महापानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आणखी काही गावांचा समाविष्ट करण्यापेक्षा वेगळी महापालिका स्थापन करून कामाचे विकेंद्रीकरण करणे योग्य ठरेल,’ असे मत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चरचे नवे अध्यक्ष सतीश मगर यांनी व्यक्त केले.

PMP ची ४ वर्षांत ५ वेळा दरवाढ

$
0
0
गेल्या चार वर्षांमध्ये चार वेळा तिकीट दरवाढ, तर एकदा तिकीट दरांमध्ये सुसूत्रता, अशी पाच वेळा तिकीट दरांची फेररचना झाल्यानंतरही पीएमपीचा तोटा पूर्णतः भरून निघण्याची चिन्हे नाहीत.

राष्ट्रीय शिक्षण दिनाचा विसर

$
0
0
देशाचे पहिले शिक्षणमंत्री डॉ. अबुल कलाम आझाद यांच्या स्मरणार्थ देशभरात साजरा होणाऱ्या ‘राष्ट्रीय शिक्षण दिना’चा सरकारी पातळीवर विसर पडल्याचे मंगळवारी दिसून आले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images