Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शहरांत ‘फडणविशी’ कायम

$
0
0
प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर भारतीय जनता पक्षात नवे प्रदेशाध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर नवी प्रदेश कार्यकारिणी लवकरच अस्तित्वात येणार आहे.

औट घटकेची संस्थाने खालसा

$
0
0
निवडणुकीपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी दोन्ही काँग्रेसने बाजार समित्यांवर नियुक्त केलेली प्रशासकीय मंडळे आणि मुदत संपलेली संचालक मंडळे बरखास्त करण्याची कारवाई पणन खात्याने मंगळवारी सुरू केली.

पंचवीस लाखांचे दागिने लुटले

$
0
0
रविवार पेठेतील गजकेसरी ज्वेलर्स हे सराफी दुकान तिघा चोरट्यांनी मंगळवारी पहाटे साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास फोडले. या दुकानातील सोन्या-चांदीचे सुमारे २५ लाख रुपयांचे दागिने चोरण्यात आले आहेत.

पवार, गडकरी एकत्र

$
0
0
महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा देऊन सर्वांना धक्का दिला असतानाच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत. हे दोघेही घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

६ सराईत गुन्हेगार गजाआड

$
0
0
कुख्यात गुंड महाकाली याच्या एन्काउंटरनंतर उफाळलेल्या टोळी युद्धातूनत्याच्या साथीदाराचा खून करणाऱ्या हणम्या उर्फ हनुमंत शिंदे याच्यासह सहा सराईत गुन्हेगारांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.

कमळाच्या चिन्हाला काँग्रेसची आडकाठी

$
0
0
देशातील कँटोन्मेंट बोर्डाच्या अकरा जानेवारीला होत असलेल्या निवडणुका पक्ष चिन्हावर घ्याव्यात यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार प्रयत्नशील आहे.

आरोपीकडून पेटवून घेण्याचा प्रयत्न

$
0
0
कोथरूडमधील शास्त्रीनगर येथे मारहाणीतील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींच्या मुलांनी हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. या प्रकारानंतर आरोपीने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

अल्पवयीन दुचाकी चोर अटकेत

$
0
0
दुचाकी फिरवण्याच्या हौसेखातर दुचाकी चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ख़डक पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी गेल्या काही महिन्यांत आठ दुचाकी चोरल्या असून त्यापैकी चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

२२ हजार पुणेकरांवर हेल्मेटविरोधी कारवाई

$
0
0
वाहतूक पोलिसांनी सुरू केलेली हेल्मेटविरोधी कारवाई दिवसेंदिवस अधिक तीव्र केली आहे. गेल्या काही दिवसांत हेल्मेट न वापरणाऱ्या १३० पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह २२ हजार २५९ पुणेकरांवर कारवाई करण्यात आली आहे.

हेल्मेटविरोधात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार

$
0
0
शहरातील ढासळलेल्या कायदा व्यवस्थेमुळेच पोलिसांनी हेल्मेटसक्तीचा बागलबुवा उभा केल्याचा आरोप हेल्मेट सक्तीविरोधी कृती समितीने केला आहे. या कृती समितीकडून टिळक (अलका) चौकात बुधवारी दुपारी आंदोलन करण्यात आले.

भाजपला ‘अपक्ष’चे काटे बोचणार?

$
0
0
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर पुणे कँटोन्मेंट बोर्डातही निर्विवाद वर्चस्व प्राप्त करण्यासाठी​ भाजप सज्ज झाला आहे. भाजपने ही किमया साधल्यास जन संघानंतर बोर्डावर पहिल्यांदाच भाजप सत्ताधारी होऊ शकेल.

सुधारित वेतनश्रेणीपासून ग्रंथपाल अद्यापही दूरच

$
0
0
राज्यभरातील माध्यमिक शाळांतील पदवीधर ग्रंथपालांना प्रशिक्षित पदवीधराची वेतनश्रेणी देण्याची ग्रंथपालांची मागणी वर्षानुवर्षे प्रलंबितच आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील निकाल ग्रंथपालांच्या बाजूने लागल्यानंतरही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित सरकार सुधारित वेतनश्रेणी देण्याबाबत उदासिनच होते.

शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थीच झाले पोरके

$
0
0
घर सोडून शिक्षणासाठी शहरी भागात आलेल्या विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात दर्जेदार अन्न, शासनाकडून दिले जाणारे विविध भत्ते आणि स्वच्छ व प्रसन्न वातावरण उपलब्ध करून देण्याकडे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

पेस्ट कंट्रोल परवाना न घेतल्यास कारवाई

$
0
0
परवाना न घेता पेस्ट कंट्रोल करणाऱ्या शहरातील पेस्ट कंट्रोल व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेने दिला आहे. शहरातील फक्त ४४० व्यावसायिकांनी परवाना घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेने दिली.

सरकारी बँकांत काम ठप्प

$
0
0
‘वेतनवाढ मिळालीच पाहिजे,’ ‘कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘आमचा हक्क मिळालाच पाहिजे,’ अशा घोषणा देत शहरातील बँक कर्मचाऱ्यांनी बुधवारी निदर्शने केली.

पोलिस आयुक्तांनी थोपटले सरकारी यंत्रणेविरुद्ध दंड!

$
0
0
शासकीय वाहनांवर अंबर दिव्याऐवजी निळे दिवे लावण्याचा आदेश काढणाऱ्यांनीच या आदेशाची स्वतःपासून अंमलबजावणी करावी. त्याबाबत आम्हाला कशाला विचारता, असे अतिशय थेट विधान करीत पुण्याचे पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनी सरकारी यंत्रणेविरोधातच दंड थोपटले आहेत.

डोंगरमाथे कापणाऱ्या बिल्डरांना चाप

$
0
0
खंडाळा गावाजवळील डोंगरमाथ्याच्या सपाटीकरणाने दगड कोसळल्याच्या घटनांची गंभीर दखल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने घेतली आहे. या ठिकाणी सुरू असलेले सपाटीकरणाचे काम तत्काळ थांबवून सद्य परिस्थितीचे छायाचित्रे न्यायाधिकरणासमोर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाषाण तलावामागे बिबट्याचा वावर

$
0
0
पाषाण तलावामागील परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे मंगळवारी रात्री स्पष्ट झाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘घरे नियमित करा, पालिकेत येऊ’

$
0
0
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होण्यास आमचा विरोध नाही, मात्र गावात आमची पूर्वीपासून असलेली आणि नियमित होण्याजोगी घरे नियमित करण्याचे धोरण सरकारने तयार करावे, अशी मागणी शिवण्यातील ग्रामस्थांनी बुधवारी केली.

‘डेंगीचे थैमान असताना चीन दौऱ्यावर कसे जाऊ?’

$
0
0
शहरात सुरु असलेली डेंगीची साथ आटोक्यात न आल्याने महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी आपला नियोजित चीनचा दौरा रद्द केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images