उन्हाळी सुट्यांचा मुहूर्त साधत खासगी ऑपरेटरनी बस भाड्यात वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीटामागे २५ ते ३० टक्के जादा रक्कम मोजून प्रवास करावा लागत आहे. या ऑपरेटरनी मनमानी भाडे आकारू नये, असा आदेश मुंबई हायकोर्टाने देऊनही त्याचे पालन होत नसल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे.
↧