पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना-मनसे असा नवा पॅटर्न झाल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँगेस आणि काँगेसला नमते घ्यावे लागले. मतदान झाल्यास दगाफटका होण्याच्या भीतीने दोन्ही काँगेसने त्यांच्या दोन उमेदवारांचे अर्ज मागे घेतल्याने आणि युतीच्या उमेदवारांसाठी मनसेने त्यांच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
↧