घोडेगावजवळील (ता. आंबेगाव) पानसरेवाडी पाझर तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. ते दोघेही दिवाळीच्या सुटीत आपल्या घरी आले होते. सुटी असल्याने गुरे घेऊन रानात गेले असताना, लहान भाऊ पोहण्यासाठी पाण्यात उतरला. परंतु तो बुडायला लागल्याने मोठ्याने त्याला वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली.
↧