धरणग्रस्तांना पुनर्वसन आणि मूलभूत सोयी सवलतींचा लाभ वेळेत मिळाला पाहिजे. राज्यघटनेने सर्वांना समान संधी दिली आहे. धरणग्रस्तांना त्यांच्या मागण्यासाठी कृष्णा खोरे विकास महांमडळाच्या कार्यालयावर लवकरच न्यावे लागेल. सध्या जनशक्तीलाही मोठे महत्त्व आहे. जनशक्ती करेल तोच कायदा यामुळे जनशक्तीला कोणीही नाकारू शकत नाही, असे प्रतिपादन लोकशासन आंदोलनाचे अध्य़क्ष व माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केले आहे.
↧