पृथ्वीच्या उपछायेमधून चंद्राचा प्रवास होताना दिसणारे चंद्रग्रहण आणि त्याच्या सोबतीलाच तेजस्वी गुरूचे दर्शन घडणार असल्यामुळे बुधवारची संध्याकाळ आकाशनिरीक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. चंद्रोदयापासूनच पूर्व दिशेला हे ग्रहण दिसणार असून, संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत पौर्णिमेच्या चंद्राचा मंदावलेला प्रकाश आकाशप्रेमींना पाहता येईल.
↧