राज्यात शैक्षणिक वर्ष २०१३पासून लागू करण्यात येणाऱ्या प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या मसुद्याविषयी राज्यभरातून ४७५६ प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. ज्ञानरचनावाद आणि आनंददायी शिक्षणावर भर देणाऱ्या आणि पाठ्यपुस्तकांचे ओझे कमी करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक कौशल्ये देऊ शकणाऱ्या या अभ्यासक्रमाविषयीच्या प्रतिक्रियांच्या समावेशाविषयी सध्या विचार सुरू आहे.
↧