एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनाचा फटका पुण्यातील एसटी बससेवेला बसला. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे दिवसभरात स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन बसस्थानकावरील अनेक बसगाड्या रद्द करण्याची नामुष्की एसटी प्रशासनावर ओढावली.
↧