पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा येथील डॉ. कणसे हॉस्पिटलसमोर प्रवासी रिक्षा उलटून गुरुवारी झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याची माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली.
↧