‘भारतीय ऑलिंपिक असोसिएशनची (आयओए) निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याबाबत लवकरच सर्व पदाधिकारी बैठक होणार आहे. या बैठकीत यावर सविस्तर चर्चा होईल. तरीही निवडणुका झाल्यात, तर त्याचीही तयारी सुरू आहे. मला अनेक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. मात्र, या बाबतचे सर्व चित्र १० नोव्हेंबरला स्पष्ट होईल,’ अशी प्रतिक्रिया भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे चेअरमन अभयसिंह चौटाला यांनी व्यक्त केली.
↧