स्वानंद फराटे केसची चौकशी करण्यासाठी आलेला तोतया सीबीआय अधिकारी अभय विनायक बनसोडे (वय ३९, रा. नगर) याच्या फसवणुकीचे अनेक कारनामे समोर येत आहे. सहकारनगर पोलिसांनी बनसोडेला अटक केल्याचे कळताच धनकवडी येथील एका महिलेनेही आपल्याला अशाच प्रकारे फसवल्याचे सांगत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
↧