विविध बँकांमध्ये बनावट खाती उघडणाऱ्या तसेच बनावट चेकद्वारे कल्याणीनगर येथील एका बँकेची १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. कोर्टात हजर केल्यावर त्याला चार नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील यांनी हा आदेश दिला.
↧