आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना तीनशे, चारशे व पाचशे चौरस फूट आकाराची ‘टाइप प्लॅन’ घरे आता बांधता येणार असून या घरांच्या नियमावलीला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. या घरांना बिगरशेती, बांधकाम नकाशे अशा किचकट प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. मात्र, अशी घरे महापालिका हद्दीपासून दहा किलोमीटर अंतराबाहेरच बांधता येणार आहेत.
↧