‘सँडी’चा तडाखा बसलेल्या अमेरिकन वाताहतीचे प्रतिबिंब आता सोशल नेटवर्किंग साइट्सवरूनही उमटायला लागले आहे. सँडी वादळामुळे होणारे नुकसान, मदतकार्य, मृत्युमुखी पडलेल्या आणि वादळामुळे अडकून पडलेल्यांसाठी सुरू असलेल्या प्रार्थना आणि सुरक्षित राहण्यासाठी संदेश देण्यासाठी सुरू असलेल्या अमेरिकन नागरिकांच्या धावपळीमुळे ‘ट्विटर’सारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर सातत्याने ट्विट्स होत आहेत.
↧