शहरात भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले असल्याने त्यावर उपाय म्हणून निवारा केंद्र (श्वान वन) उभारण्यास महापालिका प्रशासनाने नकार दर्शवला आहे. प्रत्येक कुत्र्यामागे महापालिकेला वर्षाला सुमारे १८ ते २५ हजार रुपये खर्च असून त्यांच्या व्यवस्थेसाठी मनुष्यबळ नसल्याने निवारा केंद्र उभारता येणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
↧