संगीत रंगभूमीला पुनरूज्जीवीत करण्यासाठी या क्षेत्रातील कलाकारांनी एकत्र यावे या उद्देशाने बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे येत्या ३१ ऑक्टोबरला पुण्यात राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ‘यशदा’मध्ये सकाळी साडेदहा वाजता परिषदेचे उद्घाटन होणार असून, गोवा कला अकदामीचे अध्यक्ष विष्णू सूर्या वाघ आणि प्रसिद्ध गायिका कीर्ती शिलेदार उपस्थित राहणार आहेत.
↧