खडकवासला प्रकल्पातून खरीप हंगामात केवळ सोळाशे एकरवरील उभ्या ऊस पिकांसाठी पाणी देण्यात आल्याचे एका बाजूला पाटबंधारे विभाग सांगत असताना, कृषी विभागाने प्रत्यक्षात मात्र हवेली, दौंड व इंदापूर या तीन तालुक्यांतील सुमारे साडेबारा हजार एकर क्षेत्रावरील उसाला पाणी मिळाल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे ऊस लागवडीला बंदी असताना कालव्याचे पाणी उसाच्या मळ्यांमध्ये जिरविल्याचे स्पष्ट झाले आहे.
↧