दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे गळ्यातील सोन्याची साखळी चोरणाऱ्यास पोलिसांनी पाठलाग करून पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजरत्न अजबराव कोंगरे (वय २५, रा. वडगाव बुद्रुक) हा सोमवारी (१५ ऑक्टोबर) रात्री साडेअकराच्या सुमारास खराळवाडी येथील अल्फान्सो हॉटेलसमोर त्याच्या मित्राबरोबर पायी चालला होता.
↧