काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार घरगुती सिलिंडर ग्राहकांना वर्षाकाठी सहाऐवजी नऊ सिलिंडर देण्याची ‘तसदी’ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार घेत नसल्यामुळे राज्यातील वितरक संघटनेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. घरगुती सिलिंडरसाठी एकच दर आकारून सबसिडीची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा करण्याचा प्रस्ताव वितरकांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिला आहे.
↧