मार्केट यार्डातील बोगस आडते, मदतनीस आणि डमी हमालांना आता थारा न देण्याची ‘जुनी रेकॉर्ड’ प्रादेशिक बाजार समितीच्या प्रशासकांनी बुधवारी पुन्हा एकदा वाजविली. अशा लोकांवर आता कठोर कारवाई करण्याचा इशारा देऊन, बोगस लोकांना मार्केट यार्डात आणले कुणी, असा प्रश्न उपस्थित करून या वादाचे खापर त्यांनी आडत्यांवरच फोडले.
↧