डझनभर गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव, बाल गुन्हेगारांचा सुळसुळाट, भुरट्या चोरी आणि शेतकरी-व्यापाऱ्यांना धमकावणे यामुळे मार्केट यार्ड गुन्हेगारांच्या विळख्यात अडकल्याचे पोलिसांकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून बुधवारी स्पष्ट झाले. आडते आणि व्यापा-यांना वेठीस धरणा-या गुंडांची गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला.
↧