'मराठीचे वाचन नाही, शब्दसंग्रह कमी झाला आहे, संज्ञा-संकल्पना समजून घेत ज्ञानोपासना करायची तयारी नाही. मराठीची अवहेलना सुरू आहे कारण मराठीने पोट भरत नाही, नोकरी मिळत नाही, अशी भावना वाढीस लागली आहे. भाषा पोटावर चालते. ज्ञानेश्वर-तुकारामांवर अजून किती दिवस चालणार', अशा शब्दांत ज्येष्ठ समीक्षक आणि माजी संमेलनाध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव यांनी बुधवारी भावना व्यक्त केल्या.
↧