शनिवारवाड्याच्या ऑफिसमधील तिजोरी चोरुन नेत असताना चोरट्यांना विरोध करणा-या सफाई कामगाराच्या खूनप्रकरणातील मुख्य आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. पी. जैन - देसरडा यांनी हा आदेश दिला.
↧