जेलमध्ये असलेल्या आरोपींच्या कोर्टातील केसेस लवकर निकाली निघाव्यात, म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ११ ऑगस्ट रोजी जेलमध्ये लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालत मध्ये प्ली बार्गेनिंगच्या (गुन्हा कबुलीच्या) केसेस ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. के. मलाबादे यांनी दिली.
↧