पोलिस बंदोबस्त नसला तरी अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविता येणार नाही, असे स्पष्ट करीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी मंगळवारपासून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा पर्याय खुला असल्याचा इशारा दिला आहे. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मार्च २०१२ नंतरच्या अनधिकृत बांधकामांना थारा दिला जाणार नाही, असे पुन्हा एकदा स्पष्ट केले.
↧