गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या आणि देश विघातक कृत्यांमध्ये सामील असलेल्या सर्वाधिक परदेशी नागरिकांना भारतातून हाकलल्याप्रकरणी केंद्र सरकारने पुणे पोलिसांचे कौतुक केले आहे. 'ब्युरो ऑफ इमिग्रेशन' यांच्या संचालकांनी पुणे पोलिस आयुक्त आणि पोलिस महासंचालकांना पत्र पाठवून पुणे पोलिसांची कामगिरी देशात सर्वाधिक चांगली असल्याचे म्हटले आहे.
↧