विश्रामबागवाडा सहाय्यक आयुक्त कार्यालयाने पर्यावरण दिनानिमित्त ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणा-या व्यावसायिक आणि दुकानदारांवर मंगळवारी कारवाई केली. या कारवाईत ३२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून, ५७५ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.
↧