Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कँटोन्मेंटमधून ४ अर्ज अवैध

$
0
0
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसने दोन एबी फॉर्म दिलेल्या भगवान वैराट आणि नगरसेविका हिना मोमिन यांच्यापैकी मोमिन यांचा अर्ज अवैध झाला आहे.

आचारसंहितेचे १४ गुन्हे

$
0
0
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आचारसंहितेचे चौदा गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात भाजपचे आमदार भीमराव तापकीर, कोथरूड येथील भाजपच्या उमेदवार मेधा कुलकर्णी तर राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदेरे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

वीजबिल डिस्काउंट : लाखो वंचित

$
0
0
मुदतीपूर्वी वीजबिल भरल्यास नियमानुसार मिळणारा डिस्काउंट ‘इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टिम’द्वारे (ईसीएस) भरणाऱ्या अनेक ग्राहकांना मिळत नसल्याचे समोर आले आहे. तांत्रिक समस्येमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, सुमारे सव्वादोन लाख ग्राहकांना भुर्दंड बसत आहे.

अर्ज वैध ठरल्याने उबाळेंना दिलासा

$
0
0
शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप करून भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार सुलभा उबाळे यांच्या अर्जावरील आक्षेपाचे निराकरण करीत अर्ज वैध असल्याचा निर्वाळा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिला. त्यामुळे उबाळे आणि त्यांच्या समर्थकांना दिलासा मिळाला आहे.

महेश लांडगेंचा ‘डमी’ बेपत्ता

$
0
0
भोसरी विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणारा महेश जगन्नाथ लांडगे अर्ज दाखल केल्यापासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या आईने केली.

कुत्र्यांचा धोका कायमचा संपवणार

$
0
0
शहरातील राखीव वनक्षेत्रात फिरून वन्यप्राण्यांवर हल्ला करणाऱ्या भटक्या कुत्र्यांना लगाम घालण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. पुणे विभागातील सर्व अभयारण्यांमध्ये सध्या वनरक्षक कुत्र्यांना हुसकावण्यासाठी गोफण घेऊन फिरत आहेत.

भटक्या कुत्र्यांना घ्या दत्तक!

$
0
0
भटक्या कुत्र्यांना आणि मांजरांना प्राणीप्रेमींच्या घरात स्थान मिळावे, यासाठी ‘अॅनिमल फ्रेंड्स’ या संस्थेतर्फे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त येत्या गुरुवारी प्राणी दत्तक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

वाहनांचे सुटे भाग एकाच छताखाली

$
0
0
इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन, ऑटोमोटिव्ह कॉम्पोनन्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया, ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १३ ऑक्टोबर या कालावधीत ‘ऑटो अॅन्सिलिएरी शो २०१४’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

तृतीयपंथीयांसाठी राज्यभरात एकखिडकी योजना राबवा

$
0
0
राज्य सरकारने तृतीयपंथी आयोग स्थापन करण्याच्या निर्णयाची नव्या सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी. अंमलबजावणी करताना जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करावी, या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना समितीच्या सदस्यपदी नेमणे, रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदार कार्ड, नावनोंदणी आदींसाठी एक खिडकी योजना राज्यभरात राबवण्याची मागणी श्री यल्लमा देवदासी संस्थेतर्फे करण्यात आली.

कोयत्याने वार करून खून; ५ अटकेत

$
0
0
शनिवार पेठेत फ्लेक्स लावण्यावरून दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचे पर्यवसान सोमवारी रात्री खुनाच्या प्रकारात झाले. शनिवार पेठेतील रामचंद्र अपार्टमेंटसमोर पाच ते दहा आरोपींनी दोघा तरुणांवर कोयत्याने सपासप वार केले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर उपचार करण्यात येत आहेत.

अध्यक्षपदासाठी चौरंगी लढत

$
0
0
पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवारी सायंकाळी संपली. चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. निर्वाचन अधिकारी प्रमोद आडकर यांनी ही माहिती दिली.

‘टेट’ ऑनलाइन प्रक्रिया आजपासून

$
0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्य पातळीवर घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदाची शिक्षक पात्रता परीक्षा (टेट) येत्या १४ डिसेंबरला घेण्यात येणार असून, त्यासाठीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून (एक ऑक्टोबर) सुरू होत आहे.

फी वाढीविरोधात आंदोलन

$
0
0
माईर्स एमआयटी शाळेने केलेली फी वाढ रद्द न केल्याच्या निषेधार्थ एमआयटी स्कूल पालक संघातर्फे मंगळवारी शाळेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पालक आक्रमक झाल्याने शाळेने पोलिसांना बोलावून घेतल्याने वातावरण काही काळ तंग बनले होते.

बराटे यांची मालमत्ता ८ कोटींची

$
0
0
वारसाहक्काने आलेल्या जमिनीसह वाणिज्यिक वापराची जागा आणि सोन्याचे दागिने अशी आठ कोटी रुपयांची मालमत्ता खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप बराटे यांनी जाहीर केली आहे. वारजे व कर्वेनगर भागात वारसाहक्काने एकवीस एकर जमीन बराटे यांच्याकडे आहे.

बागवे यांची मालमत्ता २.५९ कोटी रुपये

$
0
0
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांची मालमत्ता सुमारे दोन कोटी ५९ लाख रुपये आहे. पत्नीच्या नावे एक कोटी ५६ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

बाबा मिसाळांचा अर्ज फेटाळला

$
0
0
भाजपचे पुणे शहर सरचिटणीस आणि माजी नगरसेवक दीपक उर्फ बाबा मिसाळ यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात सहकारनगर, विश्रामबाग आणि शुक्रवार पोलिस चौकीच्या हद्दीत फिरण्यास कोर्टाने केलेल्या मनाईला स्थगिती मिळावी यासाठी मिसाळ यांनी दाखल केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.

महिलेचा अपघाती मृत्यू

$
0
0
मुंबई-बेंगळुरू महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला ठार झाली. हा अपघात नऱ्हे स्मशानभूमीजवळ सोमवारी रात्री घडला. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पुणे कँटोन्मेंटमध्ये उमेदवारीचा तिढा कायम

$
0
0
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदार संघातील एकाही उमेदवाराने माघार घेतली नसल्याने उमेदवारीचा तिढा कायम राहिला आहे. अर्ज छाननीमध्ये चार अर्ज अवैध ठरल्याने १९ उमेदवार रिंगणात आहेत.

पदाधिकारी रिंगणात; नियोजन गोत्यात

$
0
0
पक्षाचे शहराध्यक्ष, आमदार, माजी मंत्री असे सर्व जण निवडणुकीच्या रिंगणात असल्याने प्रचाराचे नियोजन करायचे कोणी, हा पेच शहरातील काँग्रेसजनांना पडला आहे.

शहरात आजपासून व्होटर स्लिप वाटप

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी शहरात आज, बुधवारपासून व्होटर स्लिप वाटपास सुरुवात केली जाणार आहे. हडपसर मतदारसंघातून या स्लिप वाटपाचा प्रारंभ होत असून, शहर व ग्रामीण भागातील ७० लाख मतदारांपर्यंत चौदा दिवसांत पोहोचण्याचे आव्हान निवडणूक प्रशासनासमोर आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>