Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दादांनी उपसले दबावतंत्राचे अस्त्र

$
0
0
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी गद्दारी करायची असल्यास पदांचे राजीनामे द्या अन्यथा ते आम्ही घेऊ, असा गंभीर इशारा देत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या नगरसेवकांवर दबावतंत्राचे अस्त्र वापरण्यास सुरवात केली आहे.

‘चूक पुढच्या वेळी सुधारू’

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी लढण्याची तयारी करण्याचे आदेश देऊन ऐन वेळी दुसऱ्याच उमेदवाराला पक्षाची उमेदवारी देण्याच्या खेळीने नाराज झालेल्या इच्छुकांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी मनधरणी केली. ‘या वेळी चूक झाली, पण पुढच्या वेळी सुधारू’ अशा शब्दांत त्यांनी नाराजांची मने वळविली.

पाऊस हंगाम यंदा पुण्यात ‘प्लस’

$
0
0
पहिले दोन महिने तोंडचे पाणी पळवल्यानंतर पुढील दोन महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे यंदाच्या हंगामात पावसाने सरासरी गाठली आहे. सरासरी ५६६.३ मिलिमीटर पाऊस पडणाऱ्या पुण्यात यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा १२४.५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

पुण्यात दीड तासांचे लोडशेडिंग

$
0
0
विजेच्या मागणीत झालेली प्रचंड वाढ आणि वीज वितरणातील तांत्रिक अडचणींमुळे राज्याच्या विविध भागांमध्ये मंगळवारी तात्पुरते लोडशेडिंग करावे लागले.

मोदींची सभा रेसकोर्सवर?

$
0
0
विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांचे सर्वोच्च नेते पुण्याच्या प्रचारात हजेरी लावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा पुण्यात होणार आहे.

एकच लक्ष्य... ‘टार्गेट दादा’

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना मनसेसह काँग्रेसचा थेट सामना राष्ट्रवादीशीही होणार असून, पक्षाची शहरावरील निर्विवाद सत्ता हस्तगत केलेल्या कारभारी अजित पवार यांच्यावर हल्ला चढविण्याची रणनीती आखली जात आहे.

चांगला विचार देणार आता ‘चौथे माकड’

$
0
0
चांगल्या वर्तनाची शिकवण देणाऱ्या तीन माकडांमध्ये आता चौथ्या माकडाचा समावेश होणार असून, ‘वाईट नाही मी चांगला विचार करणार’ असा संदेश हे माकड देणार आहे.

शहरात २ ठिकाणी २ EVM

$
0
0
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत समाप्त झाल्यानंतर शहरातील दोन आणि जिल्ह्यातील पाच अशा सात मतदारसंघांमध्ये पंधरापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात राहिल्याने येथे प्रत्येकी दोन मतदानयंत्रे (ईव्हीएम) ठेवावी लागणार आहेत.

बंडखोरी शमली, गटबाजीचे काय ?

$
0
0
खडकवासला मतदारसंघातील बंडखोर उमेदवारांची नाराजी दूर करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला यश आले आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात पंचरंगी लढत होणार असून, ‘युती’ व ‘आघाडी’ तुटल्याने होणाऱ्या मतविभागणीमुळे निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.

आदित्य ठाकरे यांचा आज रोड शो

$
0
0
महायुती तुटल्याचा फटका शिवसेनेला निवडणुकीत बसणार नाही. शहरातील प्रत्येक म‌तदारसंघात सेनेची ताकद असून, या निवडणुकीच्या निमित्ताने आपली ताकद दाखविण्याचा संकल्प सेनेने केला आहे.

‘कप-बशी’ मिळाली बोपोडीच्या पीरन शेलारांना

$
0
0
शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या १८ उमेदवारांपैकी सहा इच्छुकांनी ‘कप-बशी’ हे चिन्ह मागितल्याने गोंधळ उडाला. अखेर निवडणूक निर्णय अधिकारी धनाजी पाटील यांनी चिठ्ठी पद्धतीचा वापर केल्याने हा तिढा सुटला. बोपोडीतील पीरन शेलार या उमेदवाराला कपबशीचे चिन्ह मिळाले.

‘RPI’ची उमेदवारी निर्णायक ठरणार

$
0
0
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बापू पठारे, काँग्रेसचे चंद्रकांत छाजेड, शिवसेनेचे सुनील टिंगरे, भारतीय जनता पक्षाचे जगदीश मुळीक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नारायण गलांडे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

मतदार स्लिप वाटपाचे फसले नियोजन

$
0
0
जिल्हा प्रशासनाने मोठा गाजावाजा करून मतदारांना ‘व्होटर’ स्लिप वाटप करण्याचे जाहीर केले असले, तरी हडपसरमध्ये नियोजनाच्या कारणास्तव पहिल्याच दिवशी स्लिपा वाटता आल्या नाहीत.

स्वतंत्र महापालिका हाच मुख्य अजेंडा

$
0
0
बंडोबांना थंडोबा करण्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना यश आले असले, तरी पूर्व पुण्याची महापालिका स्थापन करणे आणि हडपसरचा नियोजनबद्ध विकास याच अजेंड्यावर यंदाची विधानसभेची निवडणूक रंगणार आहे.

संजय बालगुडे काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष

$
0
0
काँग्रेसचे शहराध्यक्षच यंदा विधानसभेच्या रिंगणात असल्याने पक्ष संघटन, प्रचाराचे नियोजन आणि सर्व उमेदवारांमध्ये समन्वय राखण्यासाठी नगरसेवक संजय बालगुडे यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला आहे.

भाजपपुढे आव्हान ‘अँटी-इन्कम्बन्सी’चे

$
0
0
राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात ‘अँटी-इन्कम्बन्सी’ असल्याची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच, कसब्यासारख्या मतदारसंघात विरोधी पक्षाच्या विद्यमान आमदारांनाही हे वारे थोपविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मोदींची जादू की ठाकरेंचा करिष्मा..?

$
0
0
एकत्र राहिले, तर दोघांच्या पारड्यात भक्कम मताधिक्य देणारा मतदार वेगळे झालेल्या दोघांपैकी कोणाची निवड करतो, याची परीक्षा येत्या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळेच कोथरूडमध्ये आता मोदींची जादू चालणार, की ठाकरे नावाचा करिष्मा; याचा फैसला मतदार करणार आहेत.

पर्वतीत काँग्रेससाठी प्रतिष्ठेची लढत

$
0
0
पर्वतीमध्ये खरी लढत ही भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे शहराध्यक्ष येथून लढत असल्याने काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेची खरी कसोटी पर्वतीमध्ये लागणार आहे.

गडगडाटासह जोरदार पाऊस

$
0
0
सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर बुधवारी दिवसभर शहरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरात सहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवसात दुपारनंतर शहराच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कँटोन्मेंटमधील तिढा सुटला

$
0
0
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला असून, आरपीआयचे उमेदवार नवनाथ कांबळे यांनी माघार घेतल्याने भाजपचे माजी मंत्री दिलीप कांबळे हे भाजप-आरपीआय युतीचे उमेदवार असणार आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images