Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्याची मतदारसंख्या पोहोचली ६९ लाखांवर

$
0
0
पुणे शहर व ग्रामीण भागातील ७३ हजारांहून अधिक नागरिकांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार होण्याची संधी मिळवली आहे. या मतदार नोंदणीमुळे पुण्याची मतदारसंख्या ६९ लाखांवर पोहोचली आहे.

बुट्टेपाटील, राक्षेंचा अर्ज शक्तिप्रदर्शनाद्वारे दाखल

$
0
0
खेड तालुका परिवर्तन विकास आघाडीच्या शरद बुट्टे-पाटील आणि अनिल राक्षे यांनी राजगुरुनगर शहरातून शक्तिप्रदर्शन करीत खेड मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत आमदार दिलीप मोहिते यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

व्यापाराचा ‘घाऊक’ वाद

$
0
0
गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारातील ‘किरकोळ’ व्यापाऱ्यांना देण्यात आलेल्या परवान्यांचा ‘घाऊक’ वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बाजारातील काही किरकोळ विक्रेत्यांना बाजार समितीने नोटीस बजावल्याने त्यांची भुसार बाजारातील दुकाने बंद होणार का याकडे आता व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पत्नीला पेटवले : पतीला जन्मठेपेची शिक्षा

$
0
0
पैशासाठी पत्नीचा पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश ए. बी. भिलारे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला. या प्रकरणी गोपाळ मधू पवार (वय ४०, रा. काटकरवाडी, खंडाळा) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कोथरूड येथे सोनसाखळी चोरी

$
0
0
कोथरूड येथे पायी जात असलेल्या एका ५८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी तोडून चोरून नेली. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एकलव्य कॉलेजजवळ हा प्रकार घडला.

मराठी भाषेचा मुद्दा ऐरणीवर हवा!

$
0
0
वीज, पाणी, रस्ते, गरिबी याच मुद्द्यावर वर्षानुवर्षे निवडणुका लढवणाऱ्या राजकीय नेत्यांच्या विषयपत्रिकेवर भाषेच्या संवर्धन आणि प्रसाराचा मुद्दा येण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र या संस्थेने ‘मराठीचा जाहीरनामा’ तयार केला आहे.

‘कास’ला ‘रेड लिस्ट’मध्ये टाकण्याचा इशारा

$
0
0
कास पठारावरील जैवविविधता संवर्धनासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि शाश्वत पर्यटनासाठी राबविण्यात येणारे उपक्रम जाणून घेण्यासाठी युनेस्कोचे संचालक राम भूज यांनी नुकतीच कास पठाराला भेट दिली. या वेळी चैत्राली चांदोरकर यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद…

पदवीच्या नावात गोंधळ; विद्यापीठाचा ढिसाळ कारभार

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मास्टर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनच्या (एमजेएमसी) विद्यार्थ्यांना यंदा मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझमच्याच पदव्या दिल्याचा प्रकार आता उघड झाला आहे.

कोर्टातील ई - ग्रंथालयांना आता मिळणार दर वर्षी निधी

$
0
0
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा आणि तालुका कोर्टातील वकिलांच्या ई-ग्रंथालयांना आता दर वर्षी सरकारी मदत मिळणार आहे. या निर्णयामुळे वकिलांना कायद्याची अद्ययावत पुस्तके, ई-संदर्भ व कम्प्युटर उपलब्ध होऊ शकणार आहे.

‘रायसोनी’चा मल्टीस्टेट दर्जा रद्द करा

$
0
0
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेचा मल्टीस्टेट दर्जा रद्द करावा, अशी मागणी बी. एच. आर. पतसंस्थेच्या ठेवीदार व कर्जदारांच्या समन्वय समितीने सहकार आयुक्तांकडे सोमवारी केली.

वाटलूजमध्ये शिक्षकांविना शाळा

$
0
0
दौंड तालुक्याच्या वाटलूज गावात शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्यातील वादामुळे शिक्षकांनी शाळेकडे पाठ फिरवल्याने शिक्षकांविना शाळा अशी निर्माण झाली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकांना कामावर रुजू होण्याच्या दिलेल्या आदेशाकडेही त्यांनी कानाडोळा केल्याचे दिसून आलेले आहे.

‘सेबी’ने निर्बंध घातलेल्या ‘रॉयल ट्विंकल’ची चौकशी करा

$
0
0
सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्जेंच बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) निर्बंध घातलेल्या रॉयल ​​ट्विंकल स्टार क्लब प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची चौकशी करण्याची​ मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) आठवले गट आणि भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा या संघटनांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

इंजिनीअरिंग पीएचडीसाठी किमान १ पेटंट सक्तीचे

$
0
0
बी. ई. नंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून इंजिनीअरिंग विद्याशाखेमध्ये पीएचडी मिळविण्यासाठी तुमच्याकडे किमान एक पेटंट असणे आता सक्तीचे करण्यात आले आहे.

नक्षलवादामागील भूमिका समजून घ्यावी

$
0
0
‘हिंसाचाराकडे झुकलेल्या नक्षलवादी चळवळीचे समर्थन करता येणार नाही. मात्र, नक्षलवाद्यांवर सरसकट शिक्का मारण्याऐवजी ते नक्षलवादाकडे वळण्यामागील भूमिका समजावून घ्यावी,’ असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी मांडले.

कासेवाडीतील बेपत्ता तरुणांना गडचिरोलीत नक्षलवादाचे प्रशिक्षण

$
0
0
अटकेत असलेल्या नक्षलवादी अरुण भेलके याने कासेवाडीतून बेपत्ता झालेल्या तरुणांना गडचिरोलीतील जंगलात प्रशिक्षणासाठी पाठविल्याचे तपासात समोर आले आहे. पुण्यातील ज्या तरुणाला प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार होते, त्याने याबाबत एटीएसला माहिती दिली आहे.

महायुतीच्या बंडखोरांवर ‘बसप’चा डोळा

$
0
0
महायुती तुटणार की नाही, यावर बहुजन समाज पक्षाच्या (बसप) तिकीट वाटपाची रणनीती अवलंबून आहे. युती तुटल्यास भाजप आणि शिवसेनेमधील बंडखोरांना पक्षातर्फे उमेदवारी देण्याची व्यूहरचना बसपकडून आखण्यात आली असल्याने सध्या हा पक्ष ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भू​मिकेत आहे.

वीकेंडच्या ‘सर्च’मध्ये लोणावळ्याला पसंती

$
0
0
धुक्याच्या दुलईत लपलेल्या डोंगरदऱ्या अन् कड्यांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे निर्माण झालेल्या आल्हाददायक वातावरणाला भुलणाऱ्या पर्यटकांनी ‘लोणावळ्या’ला अव्वल पर्यटनस्थळाचा मान दिला आहे.

अडीच लाखांचा गुटखा चिखलीत जप्त

$
0
0
चिखली येथील एका व्यापाऱ्याच्या दुकानातून अडीच लाख रुपये किमतीच्या गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाने जप्त करून कारवाई केली. चिखलीतील मोगा ट्रेडर्स या दुकानात दुकानमालकाने मुरमुऱ्याच्या पोत्याखाली गुटख्याचा साठा लपविल्याचे छाप्यात आढळले.

रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडी

$
0
0
बांधकाम व्यावसायिकाला टॉवरपर्यंत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने महापालिकेने वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूटमधील रस्ता रुंदीकरण करण्याचा घाट घातला आहे. यात सर्वसमान्यांचा फायदा होणार नसून वाहतुकीची कोंडी वाढणार आहे, त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचा विचार बदलावा, अशी मागणी चे अध्यक्ष संजय जाधव यांनी केली आहे.

मेळाव्यातून होणार राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन

$
0
0
कॉँग्रेससोबत आघाडी होणार की बिघाडी हे अद्याप चित्र स्पष्ट नसले तरी राष्ट्रवादी कॉँग्रेसने मात्र प्रचाराला सुरुवात केली आहे. पुणे शहर जिल्हा तसेच पिंपरी चिंचवड येथील २१ मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा येत्या चार ऑक्टोबरला बालेवाडी येथे होणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images