Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

थंडीचे पुनरागमन

$
0
0
देशात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची चाहूल लागत असतानाच शहरात थंडी जाणवू लागली आहे. रविवारी कमाल तापमानात वाढ झाली असली, तरी किमान तापमानात घट झाल्याने शहरात गार वारे वाहात होते.

विश्रांतवाडीत गुन्हे वाढले

$
0
0
वेगाने नागरीकरण होणारा येरवडा-नगर रोड- विश्रांतवाडी परिसर वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे हैराण झाला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या भागांत सोनसाखळी चोरी, जबरी चोरी आणि घरफोडीच्या घटना वाढल्या असून, पोलिसांनाही त्या रोखण्यात अपयश येत आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला डळमळीत

$
0
0
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदार संघ हा यंदा बेभरवशाचा बनला आहे. कायम काँग्रेसच्या पाठीशी असलेल्या या भागातून लोकसभा निवडणुकीत महायुतीचे खासदार अनिल शिरोळे यांना मताधिक्य मिळाल्याने येथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.

फसवणूक : कोचिंग क्लासला दंड

$
0
0
कोचिंग क्लासला प्रवेश घेताना क्लासेस इंग्रजी भाषेतून घेतले जातील असे आश्वासन देऊनही इंग्रजी भाषेत न शिकवल्यामुळे तक्रारदार विद्यार्थींनीला सेवा देताना त्रुटी ठेवल्याप्रकरणी तिने भरलेली रक्कम परत देण्यात यावी, असा आदेश एका कोचिंगला क्लासला देण्यात आला आहे.

कॉलेज निवडणुकीला ‘खो’

$
0
0
दिल्ली विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मिळविलेल्या (अभाविप) निर्भेळ यशाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालयीन निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून केला जाणारा पाठपुरावा आता थंडावला आहे.

अजितदादा नरमले

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच इंदापुरातील ‘धार’दार विधानाचे भूत पुन्हा डोक्यावर बसण्याच्या शक्यतेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नरमले आहेत. ‘एक वर्षापूर्वीच हा विषय संपला असून, तो पुन्हा उकरून काढू नका,’ असे जाहीर आवाहन त्यांनी रविवारी केले आहे.

कँटोन्मेंट उपाध्यक्षपद अद्याप रिकामेच

$
0
0
खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या त्रिसदस्य समितीच्या नागरी प्रतिनिधीची (उपाध्यक्ष) निवड येत्या महिना अखेरपर्यंत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरीही, पक्षांतर्गत गोंधळामुळे गेल्या तीन महिन्यांपासून ही निवड रखडली आहे.

सराईत गुन्हेगाराचा खून

$
0
0
पूर्ववैमनस्यातून एका सराईत गुन्हेगारावर हल्ला केल्याची घटना रविवार (२१ सप्टेंबर) रात्री साडे आठच्या सुमारास आकुर्डी येथे घडली. त्याचा सोमवारी (२२ सप्टेंबर) उपचारादरम्यान मृत्यू झाला. गौरव साठे (वय २०, रा. फरांदे चाळ, आकुर्डी) असे खून झालेल्याचे नाव आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज नेण्यास वेग

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वाटपाच्या दुसऱ्या दिवसअखेर चिंचवड मतदारसंघातून ३१, भोसरी मतदारसंघातून २४ आणि पिंपरी मतदारसंघातून ४४ जणांनी अर्ज नेले आहेत. परंतु, अद्यापपर्यंत एकानेही अर्ज दाखल केलेला नाही.

‘उद्योगी’ सर्पमित्रांना लगाम लावण्यासाठी प्रथमच मेळावा

$
0
0
मानवी वस्तीतील सापांना पकडण्याच्या निमित्ताने स्वतःचे ‘छंद’ जोपासणाऱ्या सर्पमित्रांना लगाम लावण्यासाठी आणि नव्यानेच सापांना पकडण्यास सुरुवात केलेल्या तरुणांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने वन विभागातर्फे पहिल्यांदाच सर्पमित्रांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

मावळात उमेदवारीसाठी लढाई

$
0
0
पुणे जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून मावळ तालुक्याचा उल्लेख होतो. मुंबई- पुणे या महानगरांचे मध्यबिंदू लोणावळा, खंडाळा आणि पवना खोऱ्यासारखी पर्यटनस्थळे, विपुल निसर्गसंपदा असा मतदारसंघाचा लौकीक आहे.

जगतापांच्या वर्चस्वाला ‘धक्का’?

$
0
0
हवेलीच्या विभाजनानंतर अस्तित्त्वात आलेला चिंचवड विधानसभा मतदारसंघ महासाधू मोरया गोसावी यांची संजीवन समाधिस्थळ आणि क्रांतीवीर चापेकर बंधूंचे शक्तिस्थळ म्हणून परिचित आहे.

राष्ट्रवादी पिंपरी राखणार का ?

$
0
0
शहरातील भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या तीन मतदारसंघांपैकी पिंपरी हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. हवेली मतदार संघातून विभाजन झाल्यानंतर २००९ मध्ये हा मतदार संघ अ​िस्त्वात आला.

‘हॅट् ट्रिक’ की बदल?

$
0
0
सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणून उल्लेख होत असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत एक, दोन नव्हे तर चक्क तीन मतदारसंघ निर्माण झाले. याशिवाय उर्वरित भागाचा शिरूर-हवेली, वडगाव शेरी आणि मावळमध्ये समावेश झाला. संपूर्ण शहरी भाग असलेल्या तीनपैकी एका मतदारसंघाचे नाव भोसरी होय.

बसचे पार्किंग रस्त्यावर नको

$
0
0
नूमवि शाळेच्या विद्यार्थिनी वाहतुकीच्या बस रस्त्यावर उभ्या राहात असल्याने सकाळी व सायंकाळी या परिसरातील रस्त्यांवर सातत्याने वाहतूक कोंडी होत असून, संस्थेच्या अथवा शाळेच्या आवारात बस उभ्या करण्याची व्यवस्था करावी, असे निवेदन स्थानिक नगरसेवक धनंजय जाधव यांनी शि. प्र. मंडळी संस्थेला दिले आहे.

पाषाण तलाव सुधारणा प्रकल्पाला ‘स्कॉच’ पुरस्कार

$
0
0
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुननिर्माण योजनेतील (जेएनएनयूआरएम) पालिकेच्या नदी सुधारणा प्रकल्प आणि पाषाण तलाव सुधारणा प्रकल्पास नुकतेच राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

$
0
0
जुन्नरमधील अलदरे गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिलेला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला आहे.

एसटीच्या मागील चाकाखाली सापडून वृद्ध महिलेचा मृत्यू

$
0
0
एसटी बसच्या मागील चाकाखाली सापडून लीलाबाई बाळू गोळे या वृद्धेचा सोमवारी मृत्यू झाला. भोर एसटी स्थानकाच्या आवारातच दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आगारप्रमुखांचे कार्यालय फोडून दोन बसेसवर दगडफेक केली.

अज्ञातांच्या मारहाणीत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

$
0
0
भोर तालुक्यातील निवंगुणेवाडीतील सार्वजनिक रस्ता बंद केल्याच्या कारणावरून अज्ञात व्यक्तींनी केलेल्या धक्काबुक्कीत शंकर कोंडीबा मराठे (वय ७५) यांचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

नगरसेविकेच्या पतीचे येरवड्यात बेकायदा बांधकाम

$
0
0
येरवड्यामधील नागपूरचाळ प्रभागातील रिपब्लिकन पक्षाच्या विद्यमान नगरसेविका सुनंदा देवकर यांच्या पतीने विश्रांतवाडी येथील साठे बिस्कीट पुलाजवळ वाचनालय उभारून लगतच्या नाल्यामध्ये सुमारे पाच हजार चौरस फूटाचे बेकायदेशीर बांधकाम सुरू केले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images