Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

माळीण ३.५ कोटींचा प्रस्ताव

$
0
0
आंबेगाव तालुक्यातील डोंगराखाली दबलेल्या माळीण गावच्या पुनर्वसनासाठी ३ कोटी ६२ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात माळीण ग्रामस्थांना पक्की घरे देण्याबरोबरच विविध सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

आता मोबाइल करा फटाफट चार्जिंग

$
0
0
मोबाइल फोन कितीही स्मार्ट झाले, तरी त्यांच्या चार्जिंगची समस्या मात्र अजूनही डोकेदुखीच ठरत आहे. या समस्येवर पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) फटाफट तोडगा काढला आहे, तोही टाकाऊ कागदांच्या पुनर्वापरातून!

कागदपत्रांवर फेकले ऑइल

$
0
0
पुणे शहरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून कार्यालयातील सामानाची नासधूस करत ऑइलसदृश शाई फेकली. कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीही केली. या हल्ल्याच्या विरोधात पक्षाच्या वतीने बुधवारी दुपारी दोन वाजता ओंकारेश्वराजवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर निदर्शने करण्यात येणार आहेत.

‘बालभारती’ला धडा शिकवणार

$
0
0
‘बालभारती’चा लाखो रुपयांचा कागद पावसामुळे भिजण्याचा प्रकार विद्यार्थी संघटनांनी गांभीर्याने घेतला आहे. ‘बालभारती’ प्रशासन आणि तेथील कर्मचारी विद्यार्थीहित विसरले असतील, तर विद्यार्थी संघटना आपल्या पद्धतीने ‘बालभारती’ला ‘ते’ धडे गिरविण्यास मदत करण्यास तयार असल्याची भूमिका विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.

नक्षल्यांना चंद्रपुरातून ‘रसद’

$
0
0
दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या दोघा संशयित नक्षलवाद्यांना चंद्रपूर येथून नियमितपणे पैशांचा पुरवठा होत असल्याचे त्यांच्याकडील प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. या पैशांतून पुण्यात खरेदी केलेली औषधे चंद्रपूर येथे नक्षलवाद्यांच्या उपचारासाठी पाठवण्यात येत होती.

संततधार पावसामुळे भक्तांच्या उत्साहावर पाणी

$
0
0
भोर शहरात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला शहरातील विविध भागात सुमारे ३५ ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात केली. परंतु, गेले चार दिवस सायंकाळी पडणाऱ्या संततधार पावसामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याबरोबर गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी पडले आहे.

‘पुणे बुक फेअर’ नऊ ऑक्टोबरपासून

$
0
0
पश्चिम भारतातील सर्वात मोठे पुणे बुक फेअर प्रदर्शन येत्या नऊ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पुण्यात होणार आहे. प्रदर्शनाचे तेरावे वर्ष असून, गणेश कला क्रीडांमचात हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

‘आरटीई’ची आता कडक अंमलबजावणी

$
0
0
राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने शिक्षणहक्क कायद्याचे (आरटीई) उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरांमधील ‘आरटीई’शी निगडित तक्रारींची दखल घेत आयोगाने आदेश दिले.

मतदान केंद्रांची संख्या ७.५ हजार होणार

$
0
0
पुणे शहर व जिल्ह्यातील मतदारांनी सत्तर लाखांचा आकडा ओलांडल्याने विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या साडेसात हजारपर्यंत वाढणार आहे. मतदान केंद्रे कोठे असावीत, केंद्रांच्या सध्याच्या स्थानातील बदल आणि नव्या मतदान केंद्रांसाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाने प्रस्ताव मागविले आहेत.

बोपखेलवासीयांना दिलासा

$
0
0
दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगच्या (सीएमई) हद्दीतून जाणा-या रस्त्याचा वापर करताना त्रस्त झालेल्या बोपखेलवासीयांना जाचक अटी रद्द करण्याच्या आश्वासनामुळे दिलासा मिळाला आहे.

चुकीच्या कर्जवाटपानेच ‘लोकसेवा’ अडचणीत

$
0
0
चुकीच्या पद्धतीने आणि कर्जफेडीची क्षमता न पाहता केलेले कर्जवाटपच लोकसेवा सहकारी बँकेचा एनपीए वाढण्यास कारणीभूत ठरल्याचे सहकार खात्याला आढळले आहे. बँकेच्या मोठ्या थकबाकीदारांची नावेही लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.

NCP च्या दबावापोटीच सुभाष मानेंचे निलंबन

$
0
0
राज्यातील अनेक बड्या धेंडांवर केलेल्या कारवाईमुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आणलेल्या दबावापोटीच राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याचे समोर आले आहे.

ढोल-मिरवणुकीपेक्षा नागरिक सुरक्षेवर भर

$
0
0
गणेशोत्सवात ढोलच मोठा वाजला, मिरवणूकच दोन मिनिटे उशिरा निघाली, या किरकोळ स्वरुपाच्या गोष्टींकडे जादा लक्ष न देता बॉम्बस्फोट, चोऱ्या होणार नाहीत, याचबरोबर आमच्या आई-​बहिणींची छेडछाड कोणी काढणार नाही, याकडे पोलिसांनी अधिक लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी व्यक्त केली.

निर्माल्य द्या... विनामूल्य खत न्या

$
0
0
डी. एस. कुलकर्णी फाउंडेशनच्यावतीने यंदाही ‘निर्माल्य संकलन’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून, या उपक्रमानुसार नागरिकांकडून निर्माल्य गोळा केले जाणार आहे. त्या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे खत नागरिकांना विनामूल्य देण्यात येणार आहे.

आरोग्य विद्यापीठाला नवे बोधचिन्ह

$
0
0
रेडक्रॉसचे चिन्ह असलेले नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या बोधचिन्ह आता हद्दपार झाले असून, त्याऐवजी विद्यापीठाला नव्या बोधचिन्हाची ओळख मिळाली आहे. संस्कृतमध्ये वापरलेल्या बोधवाक्यातून स्वास्थासह विज्ञानाच्या संवर्धनावर भर देण्यात आला आहे.

शिवाजी पुलावर वाहतूक कोंडी

$
0
0
महापालिका भवनासमोरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आल्याने पालिकेत कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक सुधारण्यासाठी महापालिकेते पोलिसांच्या मदतीने मुख्य भवनासमोरील रोडवर बॅरिकेड लावून केलेल्या बदलामुळे गर्दीच्या वेळी शनिवारवाड्याकडून शिवाजीनगरकडे जाताना शिवाजी पुलावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

पोलिस रोखणार अतिक्रमण

$
0
0
शहरातील बेकायदा बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पदनिर्मिती करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे अतिक्रमण थांबण्यासाठी स्वंतत्र पोलिस स्टेशनचा मार्ग मोकळा झाला आहे.

शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करा

$
0
0
राज्यातील शालाबाह्य बालकांच्या समस्यांचा अभ्यास करून, त्याविषयी उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली आहे. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने शालाबाह्य बालकांच्या समस्यांचा अभ्यास करून, त्या विषयीचा आपला अहवाल एक महिन्याच्या आत सादर करण्याचे निर्देशही राज्य सरकारने दिले आहेत.

‘रुसा’च्या रुसव्यामुळे ३ हजार कोटींचा फटका

$
0
0
राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानातून (रुसा) तब्बल तीन हजार कोटींचा निधी राज्यातील विद्यापीठांसाठी उपलब्ध होण्याची शाश्वती असतानाही, केवळ राज्य उच्चशिक्षण परिषद कार्यान्वित न झाल्याने राज्य या निधीला अद्यापही मुकले आहे.

कारभाऱ्यांमध्येच बेबनाव

$
0
0
शारदाबाई पवार मुलींच्या वसतिगृहाच्या जागेवरून सुरू असणाऱ्या वादांमुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर हा प्रस्तावच पुढे ढकलण्याची वेळ ओढवली. राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांमध्ये यावरून दोन गट निर्माण झाले असून, घोले रोड येथून वसतिगृह हलविण्यास मनसेने तीव्र विरोध केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images