Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आघाडीच्या दिग्गजांचा आज भाजपप्रवेश

$
0
0
काँग्रेसचे मराठवाड्यातील नेते व माजी सहकारमंत्री भास्करराव खतगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी वनमंत्री बबनराव पाचपुते हे आज, गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.

‘राष्ट्रवादी’चे जिल्हाध्यक्ष घुले यांचा राजीनामा

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश घुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे दिला असून त्यामुळे आता नव्या जिल्हाध्यक्षांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे नाव अध्यक्षपदाच्या चर्चेत आहे.

‘माकप’ कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध

$
0
0
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर झालेला हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे, अशा शब्दांत विविध पक्ष- संघटनांच्या वतीने बुधवारी निषेध करण्यात आला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात मंगळवारी सात-आठ जणांनी तोडफोड केली होती.

‘ठेकेदार की मनपाचे हित महत्त्वाचे?’

$
0
0
पालिकेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी केल्या जाणाऱ्या साबण खरेदीमध्ये पालिकेचे नुकसान होत असल्याचे नुकतेच समोर आले. तरीही, ठेकेदारावर अन्याय होत असल्याचे कारण पुढे करत फेरटेंडर काढण्याचा निर्णय घेणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्षांवर स्वयंसेवी संस्थांनी टीकेची झोड उठवली आहे.

सर्व्हिस टॅक्सच्या नावाखाली कोटींचा मलिदा लाटला

$
0
0
महापालिकेच्या काही सेवांसाठी केंद्र सरकारने सर्व्हिस टॅक्स (सेवा कर) माफ केलेला असतानाही पालिकेकडून सर्व्हिस टॅक्सची वसुली काही ठेकेदारांनी केली. मात्र, हा वसूल केलेला टॅक्स केंद्र सरकारकडे न भरणाऱ्या ठेकेदारांची माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या एक्साइज विभागाने ही माहिती मागविली आहे.

खाणारे अन् खिलवणाऱ्यांचे ‘लोकलकनेक्ट’

$
0
0
देशातील विविध प्रांत आणि राज्यांतील तसेच, परदेशातील त्या त्या ठिकाणच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा अनुभव, आस्वाद घरबसल्या घेता आला तर... अशी अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे..निगडी येथील श्रीराम कुंटे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी.

मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्यांनो, महाराष्ट्राचे व्हा

$
0
0
खुल्या मनाने जे महाराष्ट्रदिन साजरा करीत नाहीत, त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहू नयेत, असा टोला गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी लगावला.

‘रुपी’ कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय

$
0
0
रुपी सहकारी बँकेवरील आर्थिक निर्बंधांना तीन महिने मुदतवाढ मिळाल्यानंतर बँकेने तोटा कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या स्वच्छानिवृत्तीची (व्हीआरएस) योजना जाहीर केली आहे. या योजनेत बँकेतील ८४५ पैकी किमान तीनशे कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेतील असा अंदाज आहे.

४३ कोटींचा करमणूक कर वसूल

$
0
0
शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून आतापर्यंत सव्वा त्रेचाळीस कोटी रुपयांच्या करमणूक कराची वसूली करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आाली. राज्यभरातून मुंबई व ठाण्यानंतर पुणे जिल्ह्यातून करमणूक कराची सर्वाधिक वसूली होते.

‘PF’: आता इन्स्पेक्शन पॉलिसी

$
0
0
कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) भरला जात आहे की नाही आणि सर्व कर्मचाऱ्यांना ‘पीएफ’चा लाभ मिळतो का, याचा शोध घेण्यासाठी एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (इपीएफओ) इन्स्पेक्शन ​पॉलिसी तयार केली आहे.

जिल्हाधिकारी , ‘ZP’तही ‘KRA’

$
0
0
आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी वापरली जाणारी ‘केआरए’ची (की रिझल्ट एरिया) पद्धत आता जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेतही अंमलात आणली जाणार आहे. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांना आता यापुढे ‘केआरए’च्या निकषांनुसार काम करावे लागणार आहे.

आजपासून १२ पर्यंत ‘आवाज’

$
0
0
गणेशोत्सवात आजपासून पाच दिवस रात्री बारापर्यंत लाऊडस्पीकर सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येणार आहे. परिणामी, जलधारांच्या वर्षावात भिजलेल्या उत्सवाकडे गणेशभक्तांची उत्साही पावले मोठ्या संख्येने वळतील, अशी आशा कार्यकर्ते बाळगून आहेत.

मोदी भाषण : अद्याप अनभिज्ञता

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षक दिनी होणाऱ्या भाषणासाठी राज्यातील शालेय शिक्षण खात्याने एकीकडे लेखी आदेश काढले असताना राज्यातील उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग मात्र त्या विषयी अनभिज्ञच असल्याचे समोर आले आहे.

तोरण्याच्या कुशीत ‘स्कायलार्क चॅलेंज’

$
0
0
टीव्ही, मोबाइल, कंटाळवाणं रुटीन या सगळ्यातून बाहेर पडत एक दिवस खास स्वतःचा कस आजमावण्याची इच्छा आहे..? असेल, तर मग तुमच्यासाठी स्कायलार्क माऊंटेनिअर्सनं ‘स्कायलार्क चॅलेंज २०१४’ या भन्नाट स्पर्धात्मक उपक्रमाचं आयोजन केलं आहे.

थेट प्रवेशाचा ‘मान’

$
0
0
शूटिंग असेल किंवा इतर काही; पण मी पुण्यात आलो, की मानाचा तिसऱ्या गुरूजी तालीम गणपती मंडळाला आवर्जून जातो. ती बालगणेशासारखी मूर्ती मला अगदी मनापासून आवडते. लहानपणापासूनच ती माझी सर्वाधिक आवडती मूर्ती आहे.

...तर शिक्षक होतील इम्प्रेस

$
0
0
शाळा, कॉलेजांबाहेर आज शिक्षक दिन असल्यानं फुले आणि गुच्छ दिसतीलच. तुम्हीही आपल्या शिक्षकांना असंच काहीसं देण्याच्या विचारात असाल, तर थोड थांबा. फुलांच्या पलीकडे जाऊन विविध प्रकारच्या भेटवस्तू तुमच्या शिक्षकांना इम्प्रेस करण्यासाठी बाजारात उपलब्ध आहेत.

विद्यापीठ ‘स्वतंत्र कक्ष’ उभारणार

$
0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाच छत्राखाली विद्यापीठाविषयीची सर्व माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी एक वेगळा कक्ष उभारण्याला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने बुधवारी मान्यता दिली.

बाप्पाचरणी परदेशी वनस्पती!

$
0
0
पूजेमधील एकवीस पत्री नेमक्या कोणत्या, या विषयी अजूनही पुरेशी माहिती नसल्याने बाप्पाला चक्क परदेशी वनस्पती अर्पण करण्याचा ‘भक्तिभाव’ पुणेकरांनी दाखवला आहे. विक्रेत्यांच्या ‘कृपे’मुळे हाती पडलेल्या पत्रींमधून उंदीरमारी (ग्लिरिसिडीया), सुबाभूळ, वेडीबाभूळ, शंकासूर अशा वनस्पती बाप्पाचरणी अर्पण झाल्या आहेत.

‘एमएमसीसी’चा उत्सव

$
0
0
‘गणेशोत्सव हा आमच्यासाठी वर्षातला पहिला इव्हेंट असतो. होस्टेलवर आलेल्या सगळ्यांची त्यामुळे का होईना, एकमेकांशी ओळख होते, ती पुढे वाढते आणि त्याचेच मैत्रीमध्येही रुपांतर होते. त्यामुळे आमच्यासाठी गणेशोत्सव हा ‘अवर फ्रेंड गणेशा’चाच एक उत्सव असतो म्हणा...’

स्त्रीभ्रूण हत्या... मतदानाचे महत्त्व

$
0
0
छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा उलगडण्यापासून ते स्त्रीभ्रूण हत्या, मतदानाचे महत्त्व, जलसंवर्धन अशा विविध सामाजिक समस्यांविषयी जनजागृती करणाऱ्या जिवंत देखाव्यांच्या मालिकाच वाकडेवाडी ते गोखलेनगर या मार्गावरील काही मंडळांनी सादर केल्या आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images